Mineral Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mineral Mining: चार खाण ब्लॉक्सच्या ई-लिलावाचा आज अंतिम दिवस, लोहखनिजावर सरकारचे अधिकार कायम

डिचोली तालुक्यातील मुळगाव, मये, शिरगांव आणि सांगे मधील काले खाण या चार खाण ब्लॉक्सच्या ई-लिलावासाठी निविदा मागवल्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

खाण आणि भूविज्ञान संचालनालयाने मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशन (MSTC) मार्फत डिचोली तालुक्यातील मुळगाव, मये, शिरगांव आणि सांगे मधील काले या चार खाण ब्लॉक्सच्या ई-लिलावासाठी निविदा मागवल्या होत्या. शेवटच्या तारखेपर्यंत म्हणजेच २२ नोव्हेंबरपर्यंत एकूण ५१ निविदा कागदपत्रांची विक्री झाली असून 28 नोव्हेंबर हा बोलीचा अंतिम दिवस आहे. तांत्रिक निविदा २९ नोव्हेंबर रोजी उघडल्या जातील.

या खाणी पूर्वी मेसर्स नार्वेकर, मेसर्स राजाराम बांदेकर, मेसर्स चौघुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड आणि सेसा मायनिंग कॉर्पोरेशन यांसारख्या खाण कंपन्यांद्वारे चालवल्या जात होत्या. या चार खाण ब्लॉक साइट्सवर आधी काढलेल्या लोहखनिजावर सरकारने आपले अधिकार राखून ठेवले आहेत. तसेच खाण आणि भूविज्ञान संचालनालयाने (DMG) निविदा पत्रात तसा उल्लेख केला आहे कि, उत्खनन केलेल्या खनिजाची विक्री, लिलाव किंवा इतर कोणत्याही मार्गाने विल्हेवाट लावणे हा राज्य सरकारचा अधिकार आहे.

यापुढे डीएमजीने स्पष्ट केले आहे की ई लिलावासाठी योग्य बोली लावणाऱ्याला त्या जागेवर आधीच पडलेल्या खनिजाच्या त्या भागाची विल्हेवाट लावण्याचा अधिकार आहे. तसेच या भागावर सरकार आपला हक्क सांगणार नाही. तसेच या शुद्धीपत्रकात म्हटले आहे कि लिलावासाठी ठेवलेल्या चार खाण ब्लॉक्समध्ये अंदाजे 135 दशलक्ष टन धातूचा साठा आहे. आजच्या स्थितीत देशाच्या 60 टक्के लोह खनिजाच्या निर्यातीची जबाबदारी एकटा गोवा पार पाडतो. त्यामुळे केवळ पर्यटनच नव्हे तर खाण व्यवसायावरही गोव्याची अर्थव्यवस्था कायम अवलंबून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT