माऊस सत्तरी येथे TMC च्या सभेत बोलताना ऍड.. गणपत गावकर, सोबत दशरथ मान्द्रेकर व इतर

 

Dainik Gomantak 

गोवा

TMC चे सरकार सत्तेवर आल्यास सत्तरीतील 'जमीन' मालकीचा प्रश्न सोडवणार

तृणमूल काँग्रेसचे सरकार आल्यास सत्तरीतील जमीन मालकी प्रश्न सोडवणार, ऍड. गावकर

दैनिक गोमन्तक

पर्ये: पर्ये मतदार संघाला गेल्या 60 वर्षात विधानसभेत बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व लाभलेले नाही त्यामुळे इथल्या कष्टकरी लोकांचा अतिमहत्त्वाचा असलेला जमीन मालकीचा प्रश्न सुटलेला नाही. गेले 50 वर्षे येथे सत्ता भोगणाऱ्यांनी इथल्या जमीन मालकी प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास सत्तरीतील जमीन मालकीचा प्रश्न सोडवणार असल्याची ग्वाही सत्तरीतील जमीन मालकी प्रश्नावर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आणि पर्येतील तृणमूल काँग्रेसचे नेते ऍड. गणपत गावकर यांनी केले आहे.

माऊस सत्तरी येथे नुकतीच तृणमूल काँग्रेस (TMC) सभा संपन्न झाली. त्यावेळी त्यांनी वरील प्रतिपादन केले. यावेळी व्यासपीठावर तृणमूल काँग्रेसचे वाळपई मतदार संघाचे दशरथ मान्द्रेकर, गोपाळ गावस, हेमंत पाटील, नासिर खान, इतर कार्यकर्ते व मोठ्या संख्येने माऊस सत्तरीतील नागरिक उपस्थित होते.

यावेळी ऍड. गावकर म्हणाले की, पर्ये मतदार संघाला कष्टकरी बहुजन समाजाच्या नेत्याची गरज आहे. एका राज्य घराण्याची सत्ता येते चालली आहे. नोकरीच्या नावाखाली इथली तरुण पिढी त्या नेत्याच्या गुलामगिरीकडे झुकत आहे. ही बाब पर्येवासीयांच्या सामाजिक विकासाच्या दृष्टीने योग्य नाही. पर्येतील ही गुलामगिरी नष्ट करायची झाल्यास बहुजन समाजातील नेतृत्व येणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पुढे सांगितले की पर्येतील जनता भाजपला कंटाळली असून तृणमूल काँग्रेसच्या कोपरा बैठकावेळी आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या निवडणुकीत (Goa Assembly) तृणमूल काँग्रेसला संधी देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी वाळपईचे नेते दशरथ मान्द्रेकर यांनी सत्तरीचे नेतृत्व करणारे राणे पिता-पुत्रावर टीका केली. सत्तरीच्या जनतेला त्यांनी वापरून घेतले आहे. सत्तरीच्या स्वाभिमानी जागृत होण्याची आता हीच खरी वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान पर्ये मतदार संघात ऍड. गणपत गावकर यांच्या कोपरा बैठका मोर्ले, पर्ये, होंडा पंचायत क्षेत्राचा विविध ठिकाणी झाल्या आहेत. या बैठकांना मतदारांची लक्षणीय उपस्थिती असते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

''वैभव सूर्यवंशी-अभिषेक शर्मा जोडी टीम इंडियाचे लॉन्ग टर्म ओपनर असू शकत नाहीत...'' माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Prison Gang War: जेलमध्ये 'हिंसेचा तांडव'! कैद्यांच्या हल्ल्यात 4 सुरक्षा रक्षकांसह 23 जणांचा मृत्यू; ड्रग्ज कनेक्शन आले समोर

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईदच! एनआयएने बनवले मुख्य आरोपी; विशेष न्यायालयात चार्जशीट दाखल

IND vs ENG: Playing XI मध्ये मोठा ट्विस्ट! 'या' स्टार खेळाडूला बसावं लागणार बाकावर? इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 साठी टीम इंडियाचा मोठा निर्णय

"आम्हाला भारतात यायचंय!" POK च्या नेत्यांनी मोदी सरकारकडे मागितली मदत, एलओसी उघडण्याची केली मागणी; पाकड्यांना झटका

SCROLL FOR NEXT