Mahua Moitra Dainik Gomantak
गोवा

रेजिनाल्ड यांच्या राजीनाम्यानंतर तृणमूलचं म्हणणं काय?

पक्षावर कोणताही परिणाम नाही, रेजिनाल्ड यांना महुआ मोईत्रांच्या शुभेच्छा

दैनिक गोमन्तक

पणजी : अॅलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल काँग्रेसचा राजीमाना दिला आहे. यामुळे तृणमूल काँग्रेसला कुडतरी मतदारसंघात मोठा फटका बसण्याची चिन्हं आहेत. रेजिनाल्ड यांच्या राजीनाम्याने तृणमूल काँग्रेसला चांगलाच धक्का बसला आहे. गोव्यात सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. (Goa Election Updates: Aleixo Reginaldo Lourenco resigns)

अॅलेक्स रेजिनाल्ड (Alex Reginald Lawrence) यांनी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना आपला राजीनामा पाठवला आहे. आता तृणमूलकडून यावर अधिकृतपणे प्रतिक्रिया मिळाली आहे. रेजिनाल्ड यांनी तृणमूलचा राजीनामा दिला आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा, अशा शब्दात तृणमूल काँग्रेसच्या गोवा प्रभारी महुआ मोईत्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान रेजिनाल्ड तृणमूल सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये (Congress) दाखल होण्याची शक्यता आहे. तसे स्पष्ट संकेतच रेजिनाल्ड यांनी दिले आहेत. रेजिनाल्ड काँग्रेसमध्ये पुन्हा दाखल झाल्यास काँग्रेस दक्षिण गोव्यात आणखी बळकट होण्यास मदतच होणार आहे. सध्या गोव्यातील राजकारण नेत्यांचे राजीनामे आणि जागावाटपावरुन तापत असल्याचं चित्र आहे. त्यातच अनेक नेत्यांनी ज्या उत्साहाने तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) दाखल झाले होते, त्याच वेगाने बाहेर पडताना दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT