TMC म्हणजे 'मंदिर, मस्जिद और चर्च' Dainik Gomantak
गोवा

TMC म्हणजे 'मंदिर, मस्जिद आणि चर्च'

शुक्रवारी बॅनर्जी यांनी मच्छी मार्केट, मंदिरांसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या.

दैनिक गोमन्तक

दोन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ( TMC Bengal Chief Minister Mamata Banerjee) या पहिल्यांदाच गोव्यात (Goa) आल्या असून, सध्या त्यांचा गोवा दौरा चालू आहे. सर्वांनाच ज्ञात आहे 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचा हा गोवा दौरा असून या दौऱ्या दरम्यान TMC चा अर्थ 'मंदिर, मशीद आणि चर्च' इतक्या सोप्या भाषेत त्यांनी गोवेकरांना सांगितला.

दरम्यान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान होण्याचा प्रवास गोव्यातून सुरू होणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी इतर पक्षांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, हे केवळ पंतप्रधान होण्यासाठी नाही, तर गोव्यात शांतता आणि समृद्धी नंदावी याकरिता तृणमूल प्रयत्नशील आहे. त्याची सुरुवात गोव्यापासून पुढे भारतापर्यंत होईल. बंगालमध्ये जशी लढाई झाली, तशीच लढाई देशभरात लढू. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने गोव्यात विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी बॅनर्जी यांनी मच्छी मार्केट, मंदिरांसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या. पक्षाला नुकताच राज्यातील टेनिस स्टार लिएंडर पेस आणि अभिनेत्री नफिसा अली यांचा पाठिंबा मिळाला आहे.

ममता बॅनर्जीनी सांगितले की, भाजपने त्यांच्यावर खूप वेळा हिंदू विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला होता पण या आरोपाला सडेतोड उत्तर देत ममता दिदी म्हणाल्या 'मी हिंदू आहे, मला चारित्र्य प्रमाणपत्र देणारा तू कोण आहेस? मी ब्राह्मण कुटुंबातील आहे, पण हे सर्व मी कोणाला सांगायला जात नाही, मी मरेन, पण देशाचा वाटा कधीच देणार नाही. आम्ही लोकांना जोडण्यात धन्यता मानतो.

  • मंगेशी येथे ममता बॅनर्जी यांना काळे झेंडे दाखवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटकाव केला. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

  • मासळी मार्केट येथे स्थानिक नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी चार आश्वासने दिली. यामध्ये शासकीय अनुदानात अडीच पट वाढ, चार हजार रुपये भत्ता, मच्छीमार कल्याण मंडळाची स्थापना आदींचा समावेश आहे. लोकांच्या भेटीनंतर बॅनर्जी दक्षिण गोव्यातील मंदिरांमध्येही पोहोचल्या.

  • पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दुपारी अंत्रुज महालातील प्रसिद्ध मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान, म्हार्दोळ येथील श्री महालसा देवस्थान व कुंडई तपोभूमीला भेट दिली.

  • ममता बॅनर्जी यांनी मंगेशी येथील श्री मंगेश देवाचे तसेच म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीचे दर्शन घेतले. यावेळी पुजाऱ्यांनी गाऱ्हाणे घालून श्रींचा आशीर्वाद दिला.

  • कुंडई तपोभूमीलाही बॅनर्जी यांनी भेट दिली व दिवंगत पीठाधीश ब्रह्मानंद स्वामींच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ब्रह्मेशानंद स्वामी यांना ममता बॅनर्जी यांनी शाल व पुष्पहार अर्पण केला.

  • यावेळी तृणमूल काँग्रेसचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष लुईझिन फालेरो तसेच इतर पदाधिकारी व तपोभूमीचे अध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT