Encroachment construction 
गोवा

Santainez News: सांतिनेजच्या ‘त्या’ अतिक्रमणाचा निकाल तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला राखून; ‘गोमन्तक’ने केला होता पाठपुरावा !

Tiswadi Encroachment: सांतिनेजमधील वेलनेस औषधालयासमोरील अतिक्रमित बांधकामाविषयी सुनावणी पूर्ण होऊन त्याबाबतचा निर्णय तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून राखून ठेवण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi News: सांतिनेजमधील वेलनेस औषधालयासमोरील अतिक्रमित बांधकामाविषयी सुनावणी पूर्ण होऊन त्याबाबतचा निर्णय तिसवाडी उपजिल्हाधिकाऱ्यांकडून राखून ठेवण्यात आला आहे. सांतिनेजमधील अतिक्रमणाचा विषय ‘दैनिक गोमन्तक’ने उपस्थित केला होता.

त्या अतिक्रमणाचा अडथळा स्मार्ट सिटीच्या रस्त्याच्या कामाला होत राहिला. त्यामुळे स्मार्ट सिटीचे कामही याठिकाणी थांबलेले आहे. रस्त्याच्या बाजूचा काही भाग दुकानाच्या दुरुस्तीच्या नावाखाली बांधकामात समावेश केल्याने स्मार्ट सिटीचे काम रखडले होते. गटाराचे कामही अद्यापी रखडले असून, नव्याने बांधकाम केलेल्या ठिकाणी बीएसएनएलचा चेंबरही दबला गेला आहे.

दुरुस्तीच्या नावाखाली छोट्या दुकानाचे दोन गाळे तयार करून मोठ्या रकमेत भाड्याने देण्याचा डाव संबंधित मालकाने आखला होता. गाळे निर्माण होताच ती जागा एका मिठाई व्यावसायिकालाही भाड्याने दिली गेली होती; परंतु त्यावर वारंवार आवाज उठवल्याने व्यावसायिकाने आपले फलक व तेथे व्यवसायासाठी आणलेले साहित्य हटविले होते. त्याशिवाय नगरपालिकेने त्या बांधकामाविषयी कारणे दाखवा नोटीसही बजावली होती.

रस्ता रुंदीकरणात अडथळा होत असलेल्या या अतिक्रमणाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना दखल घ्यावी लागली होती. त्यामुळे त्यावर उपजिल्हाधिकाऱ्यांकडे हे प्रकरण सोपविण्यात आले होते. उपजिल्हाधिकारी कार्यालयात याप्रकरणी सुनावणी पूर्ण झाली असून, त्यांनी तो निर्णय राखून ठेवला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guru Gochar 2026: नशिबाची साथ अन् छप्परफाड धनलाभ! गुरु गोचरमुळे कोट्यधीश होण्याचा योग; 31 ऑक्टोबरपासून 'या' 3 राशींच्या हातात खेळणार पैसा

Aadhaar Card Email Update: आधार कार्डधारकांसाठी खूशखबर! 31 डिसेंबरपर्यंत मिळणार मोफत ईमेल अपडेटची सुविधा; UIDAI चा मोठा निर्णय

Viral Video: बीचवर आई-वडील रील्स करण्यात मग्न अन् चिमुरडी थेट लाटेच्या तावडीत... पुढं जे झालं ते तुम्हीच बघा?

Hardik Pandya Injury Update: टीम इंडियाला मोठा झटका! हार्दिक पांड्या गंभीर दुखापतीमुळे पुढील सहा महिने मैदानाबाहेर; आता 2027 मध्ये होणार पुनरागमन

Goa Unity Ride: गोव्यात 'युनिटी राइड'चे उत्साहात स्वागत; राष्ट्रीय एकात्मतेसह अमलीपदार्थमुक्त भारताचा संदेश!

SCROLL FOR NEXT