Election Updates Dainik Gomantak
गोवा

Goa Panchyat Byelection : 3 तालुक्यातील 3 पंचायतींसाठी चुरशीची लढत! 2 वाजेपर्यंतची आकडेवारी आली समोर

तिसवाडी, पेडणे, सासष्टी तालुक्यातील 3 पंचायतींसाठी पोटनिवडणूक सुरु

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Panchyat Byelection : राज्यातील तीन पंचायतींच्या प्रत्येकी एका प्रभागासाठी आज पोटनिवडणूक होत आहे. तिसवाडी तालुक्यातील सांत इस्तेव्ह (St. Estevam), पेडणे तालुक्यातील पार्से (Parcem) आणि सासष्टी तालुक्यातील धर्मापूर (Dramapur) या पंचायतींसाठी ही पोटनिवडणूक होत आहे.

दरम्यान, या तीन्ही पंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.

तीन पंचायतींमध्ये सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत पार्से पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये 67.62 टक्के मतदान झाले तर सांत इस्तेव्ह पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये 50 टक्के आणि धर्मापूर पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये 41.44 टक्के मतदान झाले आहे.

तीन्ही पंचायतींची मतमोजणी उद्या 3 जूलैला होणार आहे. मतमोजणी दिवशी मतदान केंद्राच्या 200 मीटर परिसरातील सर्व रेस्टॉरंट, बार, हॉटेल, खाद्यपदार्थांची अन्य दुकाने आदी मतमोजणी संपेपर्यंत बंद राहणार आहेत.

पार्से पंचायतीच्या सदर प्रभागात एकूण 593 मतदार, सांत इस्तेव्ह पंचायतीच्या सदर प्रभागात 502 मतदार, धर्मापूर पंचायतीच्या सदर प्रभागात 596 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT