Tiswadi  Dainik Gomantak
गोवा

Tiswadi News : तिसवाडीत मध्यरात्री दीड तास बत्तीगुल; ११० केव्ही केबल तुटली

Tiswadi News : वीज पुरवठा खंडित झाल्याने लोक उकाड्याने हैराण

गोमन्तक डिजिटल टीम

Tiswadi News :

पणजी, राज्यात अवकाळी पावसाने अधुनमधून वादळीवाऱ्यासह जोरदार वृष्टी करत आहे. काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादळीवाऱ्यामुळे नार्वे - पिळगाव तसेच कदंब पठार येथे ११० केव्ही वीज वाहिनी तुटून पडल्याने सुमारे दीड तास तिसवाडी तालुका काळोखात बुडाला.

उकाडा असह्य असून त्यातच वीजपुरवठा बंद झाल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली. रात्री तात्पुरता हा वीजपुरवठा सुरू केल्यानंतर आज सकाळी वीजवाहिनी दुरुस्त करण्यात आली.

पावसाळ्याआधीच वादळीवाऱ्यात वीज वाहिन्या तुटत असल्याने मान्सूनपूर्व कामांबाबतच लोकांनी शंका व्यक्त केली आहे.

पणजीचे कार्यकारी वीज अभियंता अरुण पाटील यांनी सांगितले की, रात्री अचानक आलेल्या वादळीवाऱ्यामुळे तिसवाडी तालुक्यात जोडणारी थिवी व कदंब पठार येथील ११० केव्ही वाहिन्या नादुरुस्त झाल्या. एक वाहिनी नार्वे - पिळगाव येथे तर दुसरी कदंब पठारावर तुटल्याने वीज पुरवठा बंद झाला. या वाहिन्या रात्रीच्यावेळी दुरुस्त करून वीज पुरवठा पूर्ववत करणे शक्य नसल्याने तात्पुरता इतर वाहिन्यांवरून कनेक्शन देऊन वीजपुरवठा दीड तासानंतर सुरू झाला.

तुटलेल्या वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम सकाळी पूर्ण झाले. तिसवाडी तालुक्याला वीज पुरवणाऱ्या वाहिन्या विद्युतभारीत करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली.

दरम्यान, पावसाळा जवळ आला तरी वीज खात्याची काही भागातील डागडुजीची कामे सुरूच आहेत. रस्त्यालगतच्या वीज खाबांवर आलेल्या फांद्या तसेच झाडेझुडपे तोडण्याची कामे सुरू आहेत. वारंवार वीज पुरवठा खंडित होणाऱ्या क्षेत्रातील ट्रान्स्फॉर्मर, फिडर तसेच ‘जंपर’ची तपासणी करण्यात येत आहे. वाऱ्यामुळे ‘जंपर’ तुटत असल्याने वीज पुरवठा खंडित होतो.

‘टोलफ्री’बाबतच लोकांच्या तक्रारी

वीज पुरवठा खंडित झाल्यास तक्रार करण्यासाठी वीज खात्याचा १९१२ टोल फ्री क्रमांक आहे. या क्रमांकावर काल अनेकांनी वीजपुरवठा बंद झाल्याने तक्रार करण्यासाठी संपर्क साधला. मात्र हा क्रमांक घेण्यास कोणीही व्यक्ती नव्हती.

लोकांनी अनेकदा हा क्रमांक डाईल केला मात्र कंटाळून तक्रार करणे सोडून दिले. किमान या क्रमांकावर तक्रारी घेण्यासाठी असलेली व्यक्ती तरी तेथे हजर असणे आवश्‍यक आहे. तक्रार नोंदवून घेऊन वीजपुरवठा बंद होण्यामागील निदान कारण तरी ग्राहकांना समजणे आवश्‍यक आहे. मात्र फोनच उचलला जात नसल्याने ग्राहकांनी संताप व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT