पणजी: तंबाखू आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आणि परदेखी तंबाखुजन्य उत्पादने विकणाऱ्यांच्या विरोधात तिसवाडी तालुका अंमलबजावणी पथकाने पणजी शहरात धडक कारवाई केली. या मोहिमेत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विविध शोरूम्स, मद्यालये आणि हॉटेलवर मिळून एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ‘कोटपा’ कायद्याच्या कलम ४चे उल्लंघन केल्याप्रकरणी पथकाने १३ चलन जारी करून संबंधितांकडून एकूण ३,००० रुपयांचा दंड वसूल केला.
ही कारवाई तिसवाडीचे संयुक्त मामलेदार अभिजित गावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात कर निरीक्षक माधुरी सिलिमकानो, नागरी आरोग्य केंद्र पणजीचे डॉ. योगेश पालकर, गोवाकॅनचे संस्थेचे समन्वयक रोलंट मार्टिन्स आणि पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल सिद्धांत शेट्ये यांचा समावेश होता.
या कारवाई दरम्यान एक मोठी गंभीर बाब समोर आली. नियमांनुसार तंबाखूजन्य पदार्थांवर असणारी ‘चेतावणी’ आणि आवश्यक आरोग्यास हानीकारक असल्याची विषय माहिती असणे बंधनकारक असते. परंतु काही ठिकाणी परदेशी तंबाखू उत्पादनांची छुप्या पद्धतीने विक्री केली जात असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले..
विना-चेतावणी परदेशी तंबाखू विक्रीच्या या गंभीर प्रकरणाची दखल घेण्यात आली असून, या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील कडक कारवाईसाठी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्याकडे सादर केला जाणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.