बुद्धिबळ संघटना निवडणुकीचा मार्ग मोकळा Dainik Gomantak
गोवा

Goa: तिसवाडी बुद्धिबळ संघटना निवडणुकीचा मार्ग मोकळा

तिसवाडीच्या (Tiswadi) उपजिल्हाधिकाऱ्यांनी (Deputy Collector) सशर्त परवानगी दिल्याने आता तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना (Chess Association) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी : तिसवाडीच्या (Tiswadi) उपजिल्हाधिकाऱ्यांनी (Deputy Collector) सशर्त परवानगी दिल्याने आता तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटना (Chess Association) निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता ही निवडणूक येत्या रविवारी होईल.यासंबंधीची माहिती मंगळवारी गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर (Kishor Bandekar) यांनी दिली. त्यांनी सांगितले, की "कोविड-19 (covid 19) विषयक सरकारी मार्गदर्शक शिष्टाचाराचे पालन करून चार जुलै रोजी निवडणूक घेण्यास तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेस परवानगी देण्यात आली आहे. सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीस परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत."(Tiswadi Chess Association paves way for elections)

गोवा (Goa) बुद्धिबळ संघटनेशी एकूण 12 तालुका संघटना संलग्न आहेत. त्यापैकी तिसवाडी व सासष्टी (Salcete) तालुका वगळता इतर दहाही तालुका संघटना बिनविरोध ठरल्या आहेत. सर्व तालुका संघटनांचे अध्यक्ष व सचिव येत्या 30 जुलै रोजी नियोजित असलेल्या राज्य संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेत भाग घेतील.तिसवाडी व सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेची निवडणूक गेल्या रविवारी नियोजित होती, पण दोन्ही संघटनेतील मतदार संख्या जास्त असल्याने कोविड-19 मार्गदर्शक शिष्टाचाराची पायमल्ली होण्याच्या शक्यतेने निवडणुकीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेत 119, तर सासष्टी तालुका बुद्धिबळ संघटनेत एकूण 56 मतदार आहेत.

शंभर जणांनाच परवानगी

तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे सचिव अरविंद म्हामल यांनी सांगितले, की रविवारी मळा-पणजी येथील महालक्ष्मी वाचन मंदिरात सकाळी साडेनऊ ते दुपारी दोन या कालावधीत निवडणूक प्रक्रिया होईल. कोविड-१९ मार्गदर्शक शिष्टाचाराचे पालन करताना निवडणूक सभागृहात शंभरपेक्षा जास्त जण उपस्थित राहू नयेत, अशी अट पाळावी लागेल. तसे स्पष्ट निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

Goa Politics: रॉय नाईक यांचा नगरसेवकपदाचा अचानक राजीनामा! फोंड्यापासून मडकईपर्यंत राजकीय चर्चांना उधाण; पुढचा डाव कोणता?

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

SCROLL FOR NEXT