Tirumala Tirupati Cooperative Society NOC Dainik Gomantak
गोवा

Tirumala Tirupati Goa : 'तिरुमला'च्या 13 शाखांना पुन्हा 'NOC', आवश्यक कागदपत्रे सादर केल्याने सहकार खात्याने घेतला निर्णय

Tirumala Tirupati Cooperative Society NOC: तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी सोसायटीने आवश्यक ती सर्व कागदपत्रे सहकार खात्याला जमा केल्याने तसेच कधीही ऑडिट करण्यास मान्यता दिल्याने या सोसायटीच्या १३ शाखा पुन्हा सुरू करण्यास खात्याने परवानगी दिली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी सोसायटीने आवश्यक ती सर्व कागदपत्रे सहकार खात्याला जमा केल्याने तसेच कधीही ऑडिट करण्यास मान्यता दिल्याने या सोसायटीच्या १३ शाखा पुन्हा सुरू करण्यास खात्याने परवानगी दिली आहे. तिरुमला तिरुपती बहुराज्य सहकारी सोसायटीला ऑडिट अहवाल सादर करण्यास अपयश आलेले होते. शिवाय या सोसायटीने अटींचाही भंग केला होता. त्यामुळे सोसायटीच्या १३ शाखांसाठी देण्यात आलेला 'ना हरकत' दाखला (एनओसी) रद्द करण्यात आलेला होता.

५ शाखांबाबत केंद्रीय निबंधकांना पाठवणार पत्र ,तिरुमला तिरुपती सहकारी सोसायटीच्या राज्यात १७ शाखा आहेत. परंतु, १३ शाखांनाच सहकार खात्याने 'एनओसी' दिली आहे. आताही त्याच १३ शाखांना पुन्हा 'एनओसी' देण्याचा निर्णय झाला आहे. उर्वरित ५ शाखांबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आपण केंद्रीय सहकार निबंधकांना पत्र पाठवणार आहे, असेही आशुतोष आपटे नमूद केले.

त्यानंतर सोसायटीने याबाबत सहकार खात्याने मागवलेली आवश्यक ती कागदपत्रे खात्याला सादर केली आहेत. शिवाय कधीही ऑडिटची तपासणी करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे सोसायटीच्या १३ शाखांना पुन्हा 'एनओसी' देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, असे सहकार निबंधक आशुतोष आपटे यांनी 'गोमन्तक 'शी बोलताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Culture: काकडीचं धार्मिक महत्त्व; गोमंतकीय संस्कृती, लोकपरंपरा आणि आरोग्याशी जोडलेला 3000 वर्षांचा रंजक इतिहास

खरी कुजबूज: गेले नगरसेवक कुणीकडे?

Bangkok School Shooting: शाळेत अंदाधुंद गोळीबार; विद्यार्थ्यानं शिक्षकाची हत्या करून स्वतःवरही झाडली गोळी, 15 विद्यार्थी जखमी VIDEO

VIDEO: भन्नाट! विल जॅक्स बनला 'सुपरमॅन'! सीमारेषेवर घेतला अफलातून झेल, व्हिडीओ पाहाल तर तुम्हीही हैराण व्हाल...

Goa Student Safety: शाळांजवळील अमलीपदार्थ विक्रेत्यांवर कडक कारवाई करा! आवदा व्हिएगस यांचे CM प्रमोद सावंतांना निवेदन

SCROLL FOR NEXT