Tilari Dam Dainik Gomantak
गोवा

आपत्ती टाळण्यासाठी तिलारीकडे लक्ष देण्याची गरज

मेघश्याम राऊत यांची मागणी : पत्रकारांच्या तुकडीसह धरणाची केली पाहणी

दैनिक गोमन्तक

डिचोली : तिलारीकडे गोवा सरकारने गांभीर्याने लक्ष घातले आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने धरणातील जलसाठ्याची पातळी वेळचेवेळी नियंत्रित ठेवली तर तिलारी धरणापासून पुराचा धोका टळू शकतो, असे मत साळ-डिचोली येथील सामाजिक कार्यकर्ते मेघश्याम राऊत यांनी व्यक्त केले.

सरकारच्या निष्काळजीपणामुळेच गेली सलग तीन वर्षे आणि त्यापूर्वीही साळसह शापोरा नदीकाठच्या गावांवर पुराची आपत्ती कोसळली होती, अशी टीकाही त्यांनी केली. राऊत यांनी डिचोलीतील पत्रकारांसह शुक्रवारी सायंकाळी तिलारी धरणाला भेट देऊन धरण परिसराची पाहणी केली.

जलसाठ्याची पातळी नियंत्रित ठेवावी

सरकारने तिलारी पाटबंधारे विभागाच्या आणि जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निदान पावसाळा जवळ येताच आणि पावसाळ्यात वेळोवेळी धरणाची पाहणी करून जलसाठ्याची पातळी नियंत्रित ठेवली तर पुरासारखी आपत्ती ओढवण्याचा धोका कमी होईल. त्याचबरोबर सरकारी यंत्रणेला धावपळ करावी लागणार नाही आणि शापोरा नदीकाठची जनताही भयमुक्त होईल, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

मुसळधार पावसामुळे तिळारी तुडुंब भरले असून, धरणातून जलविसर्ग सुरू झाला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून चार दरवाजांतून पाणी बाहेर सोडण्यात आले आहे. 113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याच्या पातळीची क्षमता आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत जलसाठ्याची पातळी 107.30 मीटर एवढी वाढली होती. मुसळधार पाऊस पडतच राहिल्यास मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT