Valpoi News Dainik Gomantak
गोवा

Valpoi News : भिरोंडातील नाणूस भागात मोटरसायकल खेळाचा थरार

चिखल, निसरडा रस्ता, अरुंद रस्ता, झाडेझुडपे अशा अडचणीच्या वाटेतून एकावेळी एकच दुचाकी अशी ही स्पर्धा सायंकाळपर्यंत रंगली.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई येथे भिरोंडा पंचायत क्षेत्रातील पाटील पेट्रोल पंपजवळ असलेल्या नाणूस भागात रविवार, १८ जून रोजी दुचाकी आँफ रोडचा थरार पाहावयास मिळाला आहे. तपला बाँयज, मोटर्स स्पोर्ट्‌स क्लब, मोटो ट्रिप यांच्यातर्फे या स्पर्धेचे आयोजन केले होते. सकाळी ८.३० वाजता स्पर्धेला प्रारंभ करण्यात आला. यात अनेक गोवा तसेच बाहेरील राज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

अत्यंत अडचणीच्या कमी जागेतून पायवाटेतून चिखलमय भागातून दुचाकीस्वारांना जाताना रोमांच येत होता. वळण, चढाव, उतार अशा आडमार्गाने दोन किलोमीटरचा प्रवास ठेवण्यात आला होता. आयोजक अल्ताफ खलिफा म्हणाले, या स्पर्धेत राज्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवरूनदेखील स्पर्धक सहभागी झाले आहेत. राज्यात रस्ते अपघात वाढले आहेत. त्यावर नियंत्रण येणे गरजेचे आहे. अशा स्पर्धेतून चालकांना सुरक्षा किती महत्त्वाची असते याचे भान होणार आहे. तरुणांना अशा साहसी खेळातून धारिष्ट्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू आहे.

सायंकाळपर्यंत रंगत

भिरोंडा पंचायत क्षेत्रात रस्त्याच्या बाजूलाच अगदी अडचणीच्या वाटेतून हा दुचाकीचा थरार पाहावयास मिळाला. चिखल, निसरडा रस्ता, अरुंद रस्ता, झाडेझुडपे अशा अडचणीच्या वाटेतून एकावेळी एकच दुचाकी अशी ही स्पर्धा सायंकाळपर्यंत रंगली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT