Drowning Case Dainik Gomantak
गोवा

वडील फोनवर बोलण्यात व्यस्त, 3 वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू; गोव्यातून मुंबईला परतण्यापूर्वी घडली घटना

गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबावर माघारी परतण्यापूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Pramod Yadav

म्हापसा: वडील फोनवर बोलण्यात व्यस्त असताना तीन वर्षीय मुलाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ग्रॅण्ड मरड, साळगाव येथील एका सिल्वर रॉक व्हिलाच्या जलतरण तलाव येथे बुधवारी (२९ जानेवारी) ही घटना घडली. गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या मुंबईतील कुटुंबावर माघारी परतण्यापूर्वी दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

व्योम जयेश राऊत (वय ०३, रा. वाशी, मुंबई) असे स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. राऊत कुटुंबीय मुंबईतून गोव्यात पर्यटनासाठी आले होते. पर्यटन उरकून मुंबईला परत जाण्यापूर्वी तीन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्योम आणि त्याचे वडील व्हिलाच्या बाहेर होते. वडील फोनवर बोलत असताना व्योम वडिलांचा हात सोडून जलतरण तलावाच्या दिशेने गेला आणि तलावात पडला.

फोनवरील संभाषण संपल्यानंतर वडिलांना मुलाचा शोध घेतला असता मुलगा पुलात पडल्याचे दिसून आले. वडिलांना तात्काळ मुलाला घेऊन वैद्यकीय रुग्णालय गाठले. दरम्यान, डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ECB New Rules: दारूला पूर्ण बंदी, सोशल मीडियावरही नियंत्रण! क्रिकेटपटूंसाठी बोर्डाचे 6 कडक नियम लागू, शिस्तभंगावर करडी नजर

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

SCROLL FOR NEXT