sisters assault case Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 3 सख्या बहिणींवर पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार; रक्षाबंधनाच्या दिवशीच प्रकरण उघड

Physical assault case in Goa: आपल्याच सख्या बहिणींवर गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल

Akshata Chhatre

केपे: बहीण-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना गोव्यातील केपे तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. आपल्याच सख्या बहिणींवर गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या नराधमाने केवळ एका बहिणीवर नव्हे, तर तिन्ही सख्या बहिणींवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.

रक्षाबंधनादिवशी बहिणीने फोडली 'त्या' अत्याचाराला वाचा

गेल्या पाच वर्षांपासून चाललेला हा मानसिक आणि शारीरिक छळ तिन्ही बहिणी सहन करत होत्या. मात्र, रक्षाबंधनाच्या दिवशी मोठ्या बहिणीने आपल्या मनात साचलेली ही वेदना एका कौटुंबिक मित्राजवळ व्यक्त केली.

त्यानंतर, त्या मित्राने तातडीने पीडितेला ॲडव्होकेट प्रतिमा कुतिन्हो यांच्याकडे नेले. ॲडव्होकेट कुतिन्हो यांनी पीडित तिन्ही बहिणींना सोबत घेऊन केपे पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

आरोपी फरार, पोलीस कसून तपास करत आहेत

पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ एफआयआर (FIR) दाखल केला आहे. एनजीओच्या मदतीने पीडित बहिणींचा जबाब नोंदवण्यात आला असून, फरार आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.

या घटनेने संपूर्ण गावात आणि समाजात संतापाची लाट उसळली आहे. बहीण-भावाच्या नात्याला कलंक लावणारी ही घटना अत्यंत निंदनीय असून, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT