Goa Crime News:  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: ‘मालीम-बेती’ खूनप्रकरणी तिघांना अटक

Goa Crime News: हार्बर कोस्टल पोलिसांची कारवाई : भांडणाचे रूपांतर झाले खुनात

दैनिक गोमन्तक

Goa Crime News: मालीम-बेती मच्छीमारी जेटीवरील मच्छीमार पद्मलोचन सलिमा याच्या खूनप्रकरणी अखेर हार्बरच्या सागरी पोलिसांनी त्याच्या तिघा सहकाऱ्यांना अटक केली आहे. या तिघांची नावे तरुण महाकुल (21, ओडिशा), संजय यादव (27, छत्तीसगड) व अंबिग (38, कर्नाटक) अशी असून मच्छीमारी ट्रॉलरवर त्यांच्यामध्ये भांडण झाल्यानंतर त्यांनी पद्मलोचनचा खून केला असल्याचे उघडकीस आले.

समुद्रात कुजलेल्या अवस्थेत पद्मलोचन सलिमा (20, ओडिशा) याचा मृतदेह सापडल्यानंतर शवचिकित्सा केली असता त्याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. पद्मलोचनच्या बरगड्यांवर हत्याराचे वार असल्याचे शवचिकित्सा व चौकशीत उघड झाल्यानंतर हार्बर कोस्टल सेक्युरिटी पोलिसांनी पद्मलोचनच्या खून प्रकरणात संशयितांविरुद्ध भादंसं 302 आणि 201 कलमाखाली गुन्हा नोंद केला होता.

तिघाही संशयितांना सहा दिवस पोलिस कोठडीत ठेवले आहे, अशी माहिती सागरी पोलिस निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिली. हार्बर कोस्टल सेक्युरिटी पोलिस स्थानकाचे निरीक्षक प्रदीप वेळीप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मालीम जेटीवरून खोल समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या ट्रॉलरवर एकूण 32 कामगार मासेमारीसाठी गेले होते.

तो ट्राॅलर मालीम जेटीवर परतला असता त्यावर काम करणारा कामगार पद्मलोचन सलिमा बेपत्ता असल्याचे आढळून आले. नंतर ट्रॉलर मालक ईशान डिसोझा यांनी त्याच्या बेपत्ता असण्याची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकावर नोंदवली होती.

12 जानेवारीला समुद्रात एक मृतदेह तरंगत असल्याचे नौदलाच्या जहाजावरील कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी तो मृतदेह हार्बर कोस्टल सेक्युरिटी पोलिसांच्या ताब्यात दिला. चौकशीवेळी एका मासेमारी ट्रॉलरवरील कामगार बेपत्ता असल्याची तक्रार पर्वरी पोलिस स्थानकावर नोंद असल्याचे उघड झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT