Sexual assault Dainik Gomantak
गोवा

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ, आयकर निरीक्षकांविरोधात गुन्हा दाखल

पणजी पोलीस स्टेशनमध्ये पाटो येथे काम करणाऱ्या तीन आयकर निरीक्षकाविरुद्ध पीडितेची तक्रार

दैनिक गोमन्तक

पणजी : आपल्यासोबत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी पणजीतील 3 आयकर निरीक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिंघांवरही लैंगिक छळ करणे, वाईट नजरेने पाहात राहणे आणि महिला कर्मचार्‍याशी अपमानजनक वागणे अशा आरोपांखाली पणजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पणजीतील पाटो परिसरात आयकर विभागाचं कार्यालय आहे. या कार्यालयात काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांकडून लैंगिक छळ होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यात मनिंदर सिंग अत्तारी, आदित्य वर्मा आणि दीपक कुमार या आयकर निरीक्षकांविरुद्ध 354, 354 अ, 354 ड, 506(ii) कलमांखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मनिंदर सिंग याने संबंधित पीडितेशी तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशा शब्दांचा वापर करुन तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान आदित्य वर्मा याने महिलेकडे नेहमी वाईट नजरेने पाहात असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. तर दीपक कुमार याने महिलेशी तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसंच तिला स्पर्श करुन तिच्याशी शारीरिक संबंधांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच त्याने महिलेसोबत अश्लील संभाषण केल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून या सर्व गोष्टी पीडितेसोबत सुरु होत्या, मात्र अखेर हे सगळं असह्य झाल्याने तिने पोलीस स्टेशन गाठत तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

मनिंदर आणि दीपक यांनी याबाबत बाहेर कुठेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा आशयाची धमकी दिल्याचंही तक्रारीत सांगण्यात आलं आहे. पणजी पोलीस स्टेशनचे निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक लॉरिन सिक्वेरा याप्रकरणी तपास करत असून अद्याप आरोपींना अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT