Goa Carnival: पणजी कार्निव्हल निमित्त पणजी महानगरपालिकेच्यावतीने आयोजित दरवर्षीप्रमाणे होत असलेल्या सांबा स्क्वेअरमध्ये रविवारी अलोट गर्दी पहायला मिळाली. खा..प्या मजा करा, असा संदेश देणाऱ्या कार्निव्हलच्या किंग मोमोनेही रात्री गाण्यांच्या तालावर ठेका धरला.
गार्सिया गार्डन शेजारी आयोजित ‘सांबा स्क्वेअर’मध्ये विविध खाद्य पदार्थ, मद्याचे स्टॉल आणि सोबतीला संगीत असे आयोजन दरवर्षी महानगरपालिका करीत असते. याहीवर्षी आयोजिलेल्या ‘सांबा स्क्वेअर’मध्ये हजारोंच्या संख्येने गर्दी दिसून आली. शनिवारी रात्रीही गर्दी दिसली. महापालिकेच्या कार्निव्हल समितीतर्फे चार दिवस हा कार्यक्रम आयोजित केला जातो. येथे जाण्यासाठी प्रवेश शुल्क आकारले जाते, त्यातून मनपाला लाखोंचा महसूल मिळतो.
संध्याकाळपासून सुरू झालेल्या कार्यक्रमात रात्री १० वाजता संगीत बंद केले जाते तरी खाद्यपदार्थांची चव घेत गप्पा मारत वेळ घालवणाऱ्यांची गर्दी काही कमी होत नाही. कर्मचाऱ्यांना मात्र खाद्य पदार्थांचे स्टॉल बंद झाल्यानंतर सफाई करूनच येथून जावे लागते.-विवेक पार्सेकर, सचिव कार्निव्हल समिती
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.