Invest Goa 2024 Dainik Gomantak
गोवा

Invest Goa 2024: रोजगाराच्‍या हजारो संधी 200 कंपन्‍या उत्‍सुक!

Invest Goa 2024: देशभरातील 200 आणि काही विदेशी गुंतवणूकदारांनी पर्यटन, औषधोत्पादन, माहिती तंत्रज्ञान तसेच लॉजिस्‍टिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमन्तक

Invest Goa 2024: देशभरातील 200 आणि काही विदेशी गुंतवणूकदारांनी पर्यटन, औषधोत्पादन, माहिती तंत्रज्ञान तसेच लॉजिस्‍टिक क्षेत्रात गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्याबाबतची प्राथमिक तयारी करण्यात येत असल्याची माहिती गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी आज रात्री ‘गोमन्तक’ला दिली.

सरकारने ‘इन्‍व्‍हेस्‍ट गोवा’ शिखर परिषदेत दोन सामंजस्य करार केले आहेत. एक टीव्हीएस इंडस्ट्रियल ॲण्‍ड लॉजिस्टिक पार्क आणि दुसरा पै काणे समूहासोबत ऊर्जा उपकरणे उत्पादनासाठी. टीव्हीएस सुमारे 125 कोटींची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहे. यामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सुमारे एक हजार नोकऱ्या निर्माण होतील, असेही त्‍यांनी सांगितले.

गोवा औद्योगिक विकास महामंडळ आणि भारतीय उद्योग महासंघातर्फे आयोजित या शिखर परिषदेला उद्योग क्षेत्रांतील नामांकित आणि प्रमुख भागधारकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. त्यांनी साधलेला प्रभावी संवाद आणि गोवा राज्यातील गुंतवणुकीच्या संधी घेण्याबाबत दर्शवलेल्या उत्साहात दोनापावल येथे आज ही परिषद पार पडली.

परिषदेत व्यवसायसुलभता वाढवणे आणि गुंतवणूकदारांसाठी सुलभ गुंतवणूक प्रक्रिया उपलब्ध करणे या उद्देशाने विकसित ‘गोवा-आयडीसी नियमन संहिता 2023 ’ आणि गोवा-आयपीबीचे संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

या परिषदेला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योगमंत्री माविन गुदिन्हो, माजी केंद्रीय वाणिज्‍यमंत्री सुरेश प्रभू, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल, प्रधान सचिव डॉ. व्ही. कांडेवेलू, महासंघाचे अध्यक्ष आणि टीव्हीएस सप्लाय चेन सोलुशन्स लि.चे चेअरमन आर. दिनेश, रसना इंटरनॅशनल लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पिरूझ खंबाटा, महासंघाचे सरसंचालक चंद्रजीत बॅनर्जी, गोवा औद्योगिक गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्‍‍वेतिका सचान,

आयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रविमल अभिषेक, डेलॉइट इंडियाचे अध्यक्ष सतीश गोपालिया, गोवा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्रीनिवास धेंपे, व्ही. एम. साळगावकर ॲण्‍ड ब्रदर्स प्रा. लि.च्या अध्यक्ष स्वाती साळगावकर आदी मान्‍यवरांची उपस्‍थिती होती.

याप्रसंगी वेर्णा औद्योगिक वसाहतीत कार्यरत ह्युजेस प्रिसिजनच्या अध्यक्षा शशी सोनी यांचा महिला उद्योजकता क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच ‘गोवा आयडीसी नियमन संहिता २०२३’ आणि गोवा-आयपीबीच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. ‘गोवा आयडीसीच्या डिजिटल पब्लिक गुड’चे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.

गोवा ठरेल गुंतवणूकदारांच्या पसंतीचे केंद्र : मुख्‍यमंत्री

सर्वच उद्योग-व्यवसाय क्षेत्रांसाठी जागतिक गुंतवणूकदारांच्या पसंतीचे केंद्र म्हणून भारताच्या किनारपट्टीलगत वसलेले गोवा राज्य प्रमुख राज्य ठरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आता जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून ओळखली जात आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पाठबळाचा गोव्‍याला मोठा लाभ झाला आहे. देशाच्या औद्योगिक क्षेत्रात एक प्रमुख यशोगाथा गोवा राज्यात घडेल आणि सर्वच उद्योग क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीसाठी पहिल्या पसंतीचे केंद्र म्हणून गोवा राज्य ठरेल, असा विश्‍‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्‍यक्त केला.

‘इन्व्हेस्ट गोवा’ परिषदेच्या माध्यमातूनच राज्याच्या व्यवसाय क्षेत्रांचा विकास होण्यास मदत होईल आणि अर्थव्यवस्था उच्च विकासाच्या मार्गावर जाऊ शकेल अशा नवीन क्षेत्रांचा शोध घेण्यास मदत होईल. लॉजिस्टिक धोरणाची निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ज्ञान साहाय्य आणि उद्योगांचा सहभाग वाढवणे आणि स्पर्धाक्षम लॉजिस्टिक व्यवसाय केंद्र घडवण्यासाठी सीआयआय सहकार्य करेल.
- आर. दिनेश, ‘टीव्हीएस’चे चेअरमन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

Goa BJP: भाजप नेत्‍यांना पक्षशिस्‍त पाळण्याच्या सूचना! Cash For Job वर जाहीर वाच्‍यता नको; गाभा समितीच्या बैठकीत घमासान

SCROLL FOR NEXT