Lairai Devi Jatra Utsav Sandip Desai
गोवा

Lairai Devi Jatra Utsav 2023 : देवी लईराई जत्रोत्सवास उत्साहात प्रारंभ; अग्निदिव्य सोहळा

शिरगावात भाविकांची अलोट गर्दी; आजपासून कौलोत्सव

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यातच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात आणि विदेशातही प्रचलित असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीच्या जत्रेस सोमवारपासून लाखो भाविक, चौगुले मानकरी, धोंड भक्तगण यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. भाविकांच्या अलोट गर्दीत मध्यरात्री अग्निदिव्याचा सोहळा पार पडला. आज (मंगळवारी) दुपारपासून कौलोत्सवास सुरूवात होणार असून तो पुढे चार दिवस चालणार आहे.

देवस्थान समिती, उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालय यांच्या सुयोग्य व शिस्तबद्ध नियोजनामुळे तसेच डिचोली पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे जत्रेस यशस्वीपणे सुरुवात झाली. जत्रा शुक्रवारी रात्री देवीचा कळस मंदिरात प्रवेश केल्यानंतर कळसोत्सवाची व पर्यायाने जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

गोव्याव्यतिरिक्त मुंबई, बेळगाव, महाराष्ट्र व कर्नाटकमधील इतर भाग तसेच सिंधुदुर्ग व सभोवतालच्या भागातील लाखो भाविकांनी श्री लईराई देवी, मुड्डेर येथील मूळ स्थानाचे, पेठ व चिरेचे दर्शन घेतले.

सोमवारी सकाळपासून मंदिरात विविध धार्मिक विधी झाले. सर्व धोंडगण पवित्र धोंडा तळीत पहाटेपासून स्नान करत होते. यानंतर मुड्डी येथे मूळस्थानावर जाऊन त्यांनी देवीच्या मूळ स्वरूपाचे दर्शन घेतले. यानंतर ते देवीच्या मुख्य मंदिरात गेले. यावेळी मंदिर परिसरात विविध धार्मिक विधी चालू होते.

तत्पूर्वी पहाटे देवीच्या कळसातील तीर्थ संपूर्ण गावातील घरांमध्ये शिंपडण्यात आले व संपूर्ण गाव शुचिर्भूत व पवित्र केला गेला. दुपारी 12च्या सुमारास मयेतील चौगुले देवीचा कवळास घेऊन शिरगावात दाखल झाले. त्यानंतर देवीची उत्सवमूर्ती (देवीची चिरा) मूळ आदिस्थानात म्हणजे मुड्डी येथे मंदिरात वाजत गाजत नेण्यात आली. दुपारच्या सत्रात सर्व धोंडभक्तगणांनी बेतनृत्याचा खेळ खेळून भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

रात्री 8वा. च्या सुमारास दुपारी मुड्डी येथे नेण्यात आलेली देवीची चिरा पूर्ववत मुख्य मंदिरात नाचत गाजत आणण्यात आली.

धोंडांच्या पवित्र स्नानानंतर अग्निदिव्य

रात्री १२ वा. देवीचा कळस मुख्य मंदिरातून बाहेर काढण्यात आला. वाजत गाजत होमखंडस्थळी आल्यानंतर देवी चंद्रज्योतीच्या सहाय्याने होमकुंडाला अग्नी देण्यात आला. त्यानंतर देवीचा कळस थेट पवित्र तळीवर स्नानासाठी नेण्यात आला. त्याबरोबर असंख्य धोंडगणही तळीवर स्नानासाठी गेले.

देवीच्या कळसात सर्वप्रथम तीन ओंजळी पाणी भरण्यात आले व कळस मुड्डी येथे मंदिरात ठेवला. धोंडगणांनी तळीवर स्नान केल्यानंतर मुड्डी येथे देवीचा प्रसाद (मोगरीचा कळा) तोंडात घेऊन अग्निदिव्य पार पाडले.

मंदिर परिसर गर्दीने फुलला

जत्रेच्या दिवशी सर्व धोंडानी उपवास पाळला व केवळ फराळ ग्रहण करून ते शिरगावात दाखल झाले. देवीच्या सर्व प्रमुख कामांमध्ये असणाऱ्या चौगुले धोंडगणांचे सोवळे व्रतही कौलोत्सवानंतर संपुष्टात येणार आहे.

मंदिर परिसर विद्युत रोषणाईने उजळला असून अस्नोडा बसस्थानक ते लईराई मंदिरापर्यंतचा परिसर भाविक आणि धोंडाच्या गर्दीने फुलून गेला आहे. रस्ताच्या दुतर्फा मिठाई, भांडी, पुस्तके व इतर घरगुती वस्तूंचे स्टॉल्स तसेच क्रीडा गॅलरी लावण्यात आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

Petrol Diesel Prices In Goa: महाराष्ट्र, कर्नाटकपेक्षा गोव्यात पेट्रोल - डिझेल स्वस्त; जाणून घ्या ताजे भाव

Junta House: ‘पणजीतील जुन्‍ता हाऊस 30 दिवसांत रिकामे करा’, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश; इमारतीचे होणार नूतनीकरण

Goa News Live: जमीन हडप प्रकरणात ED ची मोठी कारवाई; संदिप वझरकर यांच्यासह संबंधितांवर धाड

SCROLL FOR NEXT