Those who wanted to see change in Goa voted for different parties P Chidambaram
Those who wanted to see change in Goa voted for different parties P Chidambaram Dainik Gomantak
गोवा

'भाजप नवीन काही देणार नाही, गेल्या दहा वर्षांची पुनरावृत्ती करेल'

दैनिक गोमन्तक

काॅंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी खंत व्यक्त केली की गोव्यातील 67 टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात मतदान केले असले तरी, मते वेगवेगळ्या दिशेने गेल्याने भाजप सत्ता मिळवू शकला. भाजप (BJP) नवीन काही देणार नाही, पण गेल्या दहा वर्षांची पुनरावृत्ती करेल. काँग्रेस युवा पिढीवर जबाबदारी सोपवत आहे. भारतातील 60 टक्के लोकसंख्या 40 वर्षांपेक्षा कमी वयाची आहे. आगामी दशकभर भारत हा तरुण देश राहील. आपण तरुण पिढीवर जबाबदारी सोपवली पाहिजे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, जगभरातून नेतृत्वासाठी तरुण वर्ग पुढे येत आहेत. आपल्याला खंबीर राहण्याची गरज आहे आणि आता तरुण पिढीने जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांचे ध्येय साध्य होईपर्यंत संघर्ष केला पाहिजे.

प्रदेश काँग्रेसची (Congress) युवा टीम 2024 च्या लोकसभा आणि 2027 च्या विधानसभा निवडणुकांत दर्जेदार कामगिरी करेल. तसेच काँग्रेसच्या उज्ज्वल भवितव्यासाठी युवा नेत्यांनी संघटितपणे काम करावे, तसेच गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी कठीण काळात पक्षाचा डोलारा यशस्वीरित्या सांभाळल्याचे स्पष्ट केले आहे.

दरम्यान, केवळ मतविभागणीमुळेच काँग्रेसचा पराभव झाला आहे. 67 टक्के जनता भाजपविरोधात असल्याचे निकालातून उघड झाले आहे. नव्या टीमला पूर्ण सहकार्य करून काँग्रेसला पुन्हा बळकटी देऊया अस मत माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर (Girish Chodankar) यांनी यावेळी मिरामार येथे बोलताना व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT