Thivim TMC candidate Kavita Kandolkar resigns from the party Dainik Gomantak
गोवा

तृणमूल काँग्रेसला धक्का, कविता कांदोळकरांचा राजीनामा

पक्षाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत कविता कांदोळकरांचा निर्णय

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्यात नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यावेळी देशातील अनेक पक्षांनी गोव्यात आपली ताकद आजमावली आहे. यामुळे गोव्यात राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. अनेक नेत्यांनी आपला पक्ष बदलत दुसऱ्या पक्षात प्रवेश केले. आरोप-प्रत्यारोपाने ही निवडणूक चांगलीच गाजल्याचे गोवेकरांनी पाहिली.

अशातच आता कविता कांदोळकर यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकला आहे. थिवीतील समर्थक सरपंच, उपसरपंच व पंचांनीही तृणमूल काँग्रेसला राजीनामा दिला आहे. पक्षाच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत हा निर्णय घेतला आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकरही लवकरच सोडचिठ्ठी देणार असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते प्रतापसिंग राणे यांच्या आजीवन कॅबिनेट पदाच्या दर्जाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दाखल करुन घेतली आहे. अॅड. आयरीश रॉड्रिग्स यांनी ही याचिका उच्च न्यायालयात दाखल केली असून याचिकेवर 2 मे रोजी सुनावणी होणार आहे.

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratapsingh Rane) यांचा राजकारणातील अनुभव आणि राजकारणात 50 वर्षे पूर्ण केल्याने भाजप सरकारने 7 जानेवारी रोजी त्यांना आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याची अधिसूचना जारी केली होती. ही अधिसूचना आणि राज्य सरकारचा (Goa Government) निर्णय घटनेचे उल्लंघन करणारा असल्याचा दावा ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी करून तो रद्द करण्याची विनंती याचिकेत केली होती. याचिकेत रॉड्रिग्स यांनी राज्य सरकार आणि 83 वर्षीय प्रतापसिंह राणे यांना प्रतिवादी केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

नेटपेक्षा 'सराव सामना' महत्त्वाचा! भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांचे मत

Crime News: घरच्यांनी सून म्हणून नाकारलं, ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्यानचं घात केला; बायकोचा काटा काढणारा नराधम अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT