Goa Drug Case Dainiak Gomantak
गोवा

Goa Drug Case: राहत्या घरी 'गांजा'ची शेती! थिवीच्या रहिवाशाला कोर्टानं सुनावली सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा; सव्वाचार वर्षे चालला खटला

Thivim Cannabis Cultivation Case : म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने थिवी येथील रहिवासी एव्हरेस्टो डिसोझा याला घरी बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याप्रकरणी दोषी ठरवून चार वर्षे, तीन महिने आणि एकोणतीस दिवसांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

म्हापसा: आपल्या राहत्या घरी बेकायदेशीरपणे गांजाची लागवड केल्याप्रकरणी म्हापसा अतिरिक्त सत्र न्यायालयाने थिवी येथील रहिवासी एव्हरेस्टो डिसोझा याला दोषी ठरवून चार वर्षे, तीन महिने आणि एकोणतीस दिवसांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

यासोबतच त्याला ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास पाच दिवसांची अतिरिक्त सक्तमजुरी भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. विशेष म्हणजे, आरोपीला सुनावलेली ४ वर्षे ३ महिने २९ दिवसांची शिक्षा ही त्याने आधीच तुरुंगात घालवलेल्या कालावधीशी मिळतीजुळती आहे. आरोपीने ३ जून २०२० पासून २ मार्च २०२१ पर्यंत आणि पुन्हा २८ सप्टेंबर २०२२ पासून आजतागायत तुरुंगवास भोगला आहे. हा कालावधी त्याच्या मुख्य शिक्षेतून वजा केला जाणार आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, ३ जून २०२० रोजी म्हापसा पोलिसांनी थिवी येथे टाकलेल्या छाप्यात संशयिताला रंगेहाथ पकडले होते.

पुराव्यांमुळे ठरला दोषी!

खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने १३ साक्षीदार तपासले. दुसरीकडे, बचाव पक्षाने आरोपीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावा करत सर्व आरोप फेटाळून लावले होते. मात्र, दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सादर केलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने डिसोझा याला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

SCROLL FOR NEXT