Jose Philip D'Souza Dainik Gomantak
गोवा

Goa Election: 'भाजपला निवडणुकीत पराभूत करण्याचा 'हा' एकच पर्याय'

वाढत्या महागाईबरोबर बेरोजगारीमुळे जनता सत्ताधारी पक्षावर नाराज झालेली असल्याने त्यांना हद्दपार करण्यासाठी महायुती महत्त्वाची ठरेल, असे जुझे फिलिप डिसोझा म्हणाले.

दैनिक गोमन्तक

वास्को: भाजपला गोवा विधानसभा निवडणुकीत पराभूत करण्यासाठी महायुती हा एकच पर्याय विरोधी पक्षासमोर उभा राहिलेला आहे. वाढत्या महागाईबरोबर बेरोजगारीमुळे जनता सत्ताधारी पक्षावर नाराज झालेली असल्याने त्यांना हद्दपार करण्यासाठी महायुती महत्त्वाची ठरेल, असे प्रतिपादन गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा दाबोळीचे उमेदवार जुझे फिलिप डिसोझा यांनी केले. (Jose Philip D'Souza Latest News)

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) सत्ताधारी भाजपबरोबर विरोधी पक्षांनी जोरदार प्रचार आपल्या कार्यकर्त्यांसह सुरू ठेवला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कोविड-19 नियमांचे पालन करून अनेक पक्ष आपला प्रचार करीत आहेत. दाबोळी मतदारसंघात आम आदमी पक्षाबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार तथा अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी आपल्या मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन घरोघरी प्रचार केला आहे. जुझे फिलिप डिसोझा यांना दाबोळीत वाढता प्रतिसाद लाभत असल्याने त्यांनी आपल्या प्रचारावेळी विविध समस्या जनतेसमोर मांडून सत्ताधारी भाजप पक्षाची हुकूमशाही जनतेसमोर मांडली. भाजपने देशाबरोबर राज्यात सर्व गरजू वस्तूंची दरवाढ करून एकप्रकारे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. गोव्यातील जनता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कूटनीती करणाऱ्‍या भाजपला (BJP) त्याची योग्य जागा दाखविणार असल्याची माहिती डिसोझा यांनी दिली.

दाबोळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार सध्या जुझे फिलिप डिसोझा (Jose Philip D'Souza) यांनी जोराने सुरू केला आहे. डिसोझा आपल्या प्रचारात दोन फेऱ्या सध्या दाबोळीत पूर्ण केल्या आहे. यावेळी जुझे फिलिप डिसोझा म्हणाले, की राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी एकमेव पर्याय म्हणजे महायुती हाच असून यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. राज्यात यंदा मोठा बदल होणार असल्याने सत्ताधारी पक्ष घाबरला असल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

Asian Games 2026: ब्लॉकबस्टर फायनल होणार! श्रीलंकेला 124 धावांनी धूळ चारत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश, आता जेतेपदासाठी पाकिस्तानशी होणार 'कांटे की टक्कर'

Success Motivation: 'प्रयत्ने वाळूचे कण रगडिता..!'; अपयश आलं तरी थांबू नका, प्रयत्नांची साथच यशाचा मार्ग दाखवते

Mental Health Rehabilitation: मानसिक आजारावर उपचार झाले, पण पुढे काय?; रुग्णाच्या पुनर्वसनासोबत कुटुंबालाही आधाराची गरज

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

SCROLL FOR NEXT