PM Narendra Modi And Viriato Fernandes Dainik Gomantak
गोवा

PM Modi On Viriato: 'हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान'; विरियातोंच्या वक्तव्यावर मोदींची प्रतिक्रिया

PM Modi On Viriato: मोदी भाजपच्या प्रचारसभेत बोलताना विरियातो यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला, तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा 'शहजादा' असा उल्लेख केला.

Pramod Yadav

PM Narendra Modi On Congress Candidate Viriato Fernandes

दक्षिण गोव्याचे काँग्रेस उमेदवार विरियातो फर्नांडिस यांनी संविधानाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद देशात देखील उमटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरियातोंचे व्यक्तव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. मोदी भाजपच्या प्रचारसभेत बोलताना विरियातो यांच्या वक्तव्याचा उल्लेख केला, तसेच यावेळी त्यांनी राहुल गांधी यांचा 'शहजादा' असा उल्लेख केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगढ येथील जांजगीर-चंपा येथे भाजपच्या प्रचारसभेत बोलत असताना त्यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने आणखी एक मोठी खेळी सुरु केली आहे. अगोदर कर्नाटकच्या एका खासदाराने दक्षिण भारताला वेगळा देश घोषित करु असे वक्तव्य केले.

आता गोव्यातील काँग्रेस उमेदवार गोव्यात भारतीय संविधान लागू होणार नाही, असे वक्तव्य करत आहेत. गोव्यावर संविधान लादण्यात आल्याचे ते म्हणत आहेत. आणि त्यांनी ही बाब काँग्रेसचे 'शहजादा' (राहुल गांधी) यांना सांगितली आहे. हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा अपमान आहे की नाही? असा सवाल मोदींनी सभेत उपस्थित केला.

नरेंद्र मोदींनी यावेळी जम्मू काश्मिरचा दाखला देत तिथे देखील काही लोक असेच म्हणत होते. पण, लोकांनी मोदींना आशिर्वाद दिला आणि आता तेथील लोक संविधान मानत आहेत, असे मोदी म्हणाले.

काँग्रेस उमेदवाराने याबाबत नेत्याला सांगितले असून, कुठे ना कुठे काँग्रेसचे देखील या विचारला समर्थन असल्याचे दसून येते, असे मोदी म्हणाले. आज गोव्यात संविधान नाकारण्याची भाषा करत आहेत, पुढे संपूर्ण देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान नाकारण्याचे पाप काँग्रेस करेल असे, मोदी सभेत म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT