Tulsidas Shambhu Bhandari Goa Digital team
गोवा

Sange News : तीस वर्षे रूग्णसेवेत : अडल्या-नडलेल्यांचा उगे-सांगेतील आधार

महागड्या वैद्यकीय उपचारांपेक्षा गावठी उपाय बरा, आणि किफायतशीर असल्यामुळे आज पर्यंत ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचार पद्धती तग धरून

गोमंतक ऑनलाईन टीम

सांगे : यांत्रिक आणि तांत्रिक युग कितीही विकसित होत गेले तरी अजूनही ग्रामीण भागात खेड्यापाड्यात आयुर्वेदिक आणि खास करून गावठी औषधोपचार हाच तत्काळ उपाय म्हणून केला जात आहे. महागड्या वैद्यकीय उपचारांपेक्षा गावठी उपाय बरा, आणि किफायतशीर असल्यामुळे आज पर्यंत ग्रामीण भागात आयुर्वेदिक उपचार पद्धती तग धरून आहे. त्यातही अडल्या-नडल्यांचा देवदूत म्हणून गेली तीस वर्षे रुग्णसेवा करणाऱ्या उगे सांगेतील तुळशीदास शंभू भंडारी यांची ओळख आहे.

हात-पायच नव्हे शरीरातील कुठलेही हाड मोडले की ते परत दुरुस्त करण्याची किमया तुळशीदास भंडारी यांनी साधली आहे. त्यामुळे सांगे सारख्या ग्रामीण भागात अपघातग्रस्त रुग्ण तत्काळ उपचार म्हणून थेट त्यांच्या घरी येतात. तुटलेले आणि मोडलेले हाड पुन्हा जुळवणारे तुळशीदास भंडारी तिसऱ्या पिढीतील वैद्य आहेत.

संगीताची आवड असलेले तुळशीदास पद्मनाभ संप्रदायचे शिष्य असून आयुर्वेदिक शिक्षणाची पदवी नसली तरी आजोबा, काका यांच्या अनुभवाची शिदोरी सोबत आहे. आयुर्वेदिक शिक्षण घेतलेली सून डॉ. दिव्या मदत करते. फक्त माफक खर्च रुग्णांकडून घेतो. त्यामुळे रुग्णही समाधान करतात,असेही तुळशीदास म्हणाले.

तिसरी पिढी रूग्णांच्या सेवेत

सर्वप्रथम सगुण भंडारी हे त्यांचे आजोबा तुटलेली हाडे जोडत असत. त्यानंतर वासू भंडारी हे त्यांचे काका यांनी हे व्रत आरंभले केले. आणि आयुर्वेदिक व्यवसायातील तिसरी पिढी म्हणजे तुळशीदास भंडारी यांनी आपल्या काकांकडून हे शिक्षण आत्मसात केले. ते रुग्णांची कशी सेवा करतात,हे त्यांनी बारकाईने पाहिले. आणि काकांचे निधन झाल्यानंतर घराण्यातील सेवा म्हणून १९९२ पासून तुळशीदास भंडारी रूग्णसेवा करत आहेत.

निव्वळ आयुर्वेदिक उपायांद्वारे पाच हजारहून अधिक रुग्णांची हाडे जोडली. कंबर, पाठदुखीवरही उपाय योजना केली. दर चार दिवसांनी, आठ दिवसांनी रुग्णांना पुन्हा येऊन नवीन मलमपट्टी करावी लागते. संपूर्ण गोवा, जवळचा कर्नाटकचा भाग, महाराष्ट्रातूनही रुग्ण येतात.

-तुळशीदास भंडारी, वैद्य

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

Goa News: गोव्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांसाठी नेतृत्व विकास कार्यक्रम! पुण्यातील 'इन्फोसिस सेंटर'मध्ये प्रशिक्षण

Old Goa Helipad: गोव्यात हेलिपॅडवरुन केवळ 55 यशस्वी उड्डाणे! खर्च मात्र कोटीत; 'बॅट' बेटाचा पर्याय पुढे

SCROLL FOR NEXT