Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Third District In Goa: गोव्यात तिसरा जिल्हा होणार; प्रक्रिया सुरु असल्याची खुद्द मुख्यमंत्री सावंतांची माहिती

Goa News: राज्यात आदीवासीबहूल तिसरा जिल्हा असावा अशी मागणी अनेक वर्षापासून गोव्यात होत आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात तिसरा जिल्हा होण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. बुधवारी (०८ डिसेंबर) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांना संबोधित करताना मुख्यमंत्री सावंत बोलत होते. गेल्या काही महिन्यांपासून तिसऱ्या जिल्ह्याची मागणी गोव्यात जोर धरत आहे.

पर्वरी येथील मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सावंत यांनी विविध क्षेत्रासाठी कंत्राट पद्धतीने भरण्यात येणाऱ्या पदांची माहिती दिली. तसेच, सरकारी नोकरी भरती प्रक्रिया सुरुच राहिल, असे सांगितले. राज्यात सुरु असलेल्या तिसऱ्या जिल्ह्याची मागणीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी तिसरा जिल्हा होणाराय, यासाठी प्रक्रिया सुरु आहे. मंत्रिमंडळाच्या मंजूरीनंतर तो अस्तित्वात येईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

राज्यात तिसऱ्या जिल्ह्याची मागणी वारंवार होत आहे. माजी मुख्यमंत्री व विद्यमान कृषीमंत्री रवी नाईक यांनी देखील याबाबत भाष्य केले होते. यासाठी ते आग्रही असल्याचे त्यांनी म्हटले होते. याशिवाय सभापती रमेश तवडकर आणि वीज खात्याचे मंत्री सुदीन ढवळीकरांनी देखील तिसऱ्या जिल्ह्याच्या स्थापनेबाबत सकारात्मकता दर्शवली होती. दरम्यान, आता खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावर भाष्य केल्याने तिसरा जिल्ह्याच्या स्थापनेबाबत आशावाद व्यक्त केला जात आहे.

राज्यात आदीवासीबहूल तिसरा जिल्हा असावा अशी मागणी अनेक वर्षापासून गोव्यात होत आहे. यासाठी मंत्री रवी नाईक आग्रही असल्याचे पाहायला मिळाले होते. सभापती रमेश तवडकरांनी देखील याला दुजोरा दिला होता. तिसऱ्या जिल्ह्याचे मुख्यालय काणकोण येथे असावे असा देखील एक प्रस्ताव समोर आला होता.

दक्षिण गोव्याचे विभाजन करुन तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीची मागणी होत आहे. सरकारने तिसऱ्या जिल्ह्याचा प्रस्तावा मांडल्यास काणकोण, सांगे, धारबांदोडा आणि केपे या तालुक्यांचा मिळून हा नवा जिल्हा अस्तित्वात येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT