Gold Chain Snatching  Dainik Gomantak
गोवा

Quepem Crime News : केपेत चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच; बसमध्ये चढताना दोन महिलांच्या सोनसाखळ्या लंपास

अठरा ग्रॅम वजनाच्या दोन सोनसाखळ्या लंपास

सुशांत कुंकळयेकर

Quepem : राज्यात सोनसाखळ्या हिसकावून नेण्याचे प्रकार वाढले असून रविवारी दुपारी केपे येथे प्रवासी बसमध्ये चढताना दोघा प्रवाशांच्या गळ्यातील सोनसाखळी पळवून नेण्यात आल्या. दोन्ही मिळून सुमारे अठरा ग्रॅम वजनाच्या सोनसाखळ्या हिसकावून नेल्याने केपेत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केपे येथे दर रविवारी बाजार भरतो. या बाजाराला ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांची मोठी गर्दी असते. आज दुपारी केपे येथून कावरे पिरला येथे जाणाऱ्या प्रवासी बसमध्ये चढण्यासाठी लोकांनी बरीच गर्दी केल्याने याचा फायदा घेत चोरट्याने एका महिलेच्या व एका मुलीच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावून नेली.

बस काही अंतरावर पोहचल्यानंतर दोघांनीही आपल्या गळ्यात सोनसाखळी नसल्याने आरडाओरड केल्याने बस तेथेच थांबवून केपे पोलिस स्थानकात आणण्यात आली. यावेळी प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली असता काहीही सापडून न आले आल्याने नंतर बस तेथून सोडण्यात आली.

आजच्या चोरीची घटना केपे पोलीस स्थानकात नोंद करण्यास दोन्ही महिलांनी नकार दिल्याने केपे पोलिसांनी त्यांची जबानी नोंद करून बस सोडून देण्यात आली. मात्र सदर प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

रविवारचा केपे बाजार मोठ्या प्रमाणात भरत असल्याने गर्दीचा फायदा घेऊन चोरटे आपला डाव साधतात असे लोकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपूर्वी याच बसमध्ये चढताना एका जेष्ठ नागरिकाच्या खिशातील चार हजार रुपये चोरून नेल्याचे एकाने सांगितले. चोरीचे प्रकार अचानकपणे वाढल्याने केपे वासीयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT