Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सेरनाभाटी येथे ब्रिटिश पाऊंड्सची चोरी करणारा गजाआड; हैदराबादमध्ये केली अटक

टेक्निकल सर्व्हेलन्सद्वारे काढला माग

Akshay Nirmale

Goa Crime: सेरनाभाटी येथे झालेल्या चोरीच्या घटनेत ब्रिटिश पाऊंड्सची चोरी झाली होती. त्याची रूपयातील किंमत सुमारे अडीच लाख रूपये होती. या चोरीप्रकरणी मुख्य संशयित असलेल्या पबित्रा नाईक याला पोलिसांनी नुकतेच हैदराबाद येथून अटक केली आहे.

पोलिस उपनिरीक्षक दीपा देयकर, कॉन्स्टेबल सुशांत पागी आणि सिद्धेश शिरोडकर यांनी टेक्निकल सर्व्हेलन्सद्वारे माग काढत पबित्रा दया नाईक (वच 26) यााला अटक केली. तेलंगणातील हैदराबाद येथून पबित्रा नाईक याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा कुचगाव, ओडिशा येथील रहिवाशी आहे. सेरनाभाटी येथील चोरी प्रकरणी तो पोलिसांना हवा होता. 22 नोव्हेंबर 2022 रोजी सेरनाभाटी येथे झालेल्या चोरीत त्याने ब्रिटिश पाऊंड्सची चोरी केली होती. त्याची रूपयातील रक्कम जवळपास अडीच लाख रूपये होत होती.

दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया, मडगावचे एसडीपीओ शिवेनू भुषण, कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक थेरन डीकॉस्टा यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WPL 2026: जेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स सज्ज; सराव करण्यासाठी खेळाडू गोव्याच्या मैदानात Watch Video

Olive Ridley: गालजीबाग किनाऱ्यावर 'रिडले'ची 109 अंडी, केंद्रात उबवण्यासाठी लागणार 48 ते 58 दिवस

सरकारी कार्यालयांत शुकशुकाट, वास्कोत परिणाम; वर्षअखेर बहुतांश कर्मचारी रजेवर

Arpora Nightclub Fire: हडफडेतील क्लब संरचना मूलतःच बेकायदेशीर, व्यापार परवाना नाही हे माहित होते; पंचायत सचिवाची जबानी

2026 New Rules: गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून लागू झाले 'हे' 8 नवे नियम! सामान्यांच्या खिशाला कात्री

SCROLL FOR NEXT