Goa GI Tag Dainik Gomantak
गोवा

Goa GI Tag: गोव्याच्या 'या' पाच खास उत्पादनांना मिळणार जीआय मानांकन

प्रकिया अंतिम टप्प्यात; जीआय निबंधकांनी राज्य विज्ञान-तंत्रज्ञान विभागाला अहवाल सादर करण्यास सांगितले

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa GI Tag: गोवा सरकारने मानकुराद आंबा, गोवा काजू, आगशीचे वांगे, सातशिरा भेंडी आणि गोवन बेबिंका ही मिठाई अशी पाच उत्पादने जीआय मानांकन मिळण्यासाठी सादर केली होती. दरम्यानच्या काळात कोरोना महामारीमुळे या प्रक्रियेला विलंब झाला आहे.

तथापि, जीआय टॅग मिळण्याची ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आल्याचे समजते. येत्या काही काही महिन्यांत ही प्रक्रिया पार पडू शकते.

या पाचही उत्पादनांचे गोव्याशी खास असे नाते आहे. ही पाचही उत्पादने गोव्याच्या संस्कृतीचा भाग बनली आहेत. ही पाचही उत्पादने परीक्षणानंतर जीआय निबंधकांनी स्विकारली आहेत. त्यानंतर राज्य विज्ञान-तंत्रज्ञानाला त्यासंदर्भात अहवाल सादर करण्यास सां​गितले आहे. डिसेंबर अखेरपर्यंत हा अहवाल जीआय निबंधकांना सादर केला जाऊ शकतो.

जीआय निबंधकांनी मान्यता दिल्यानंतर हा अहवालावर हरकती मागवल्या जातात. या काळात कुणी आक्षेप न घेतल्यास संबंधित उत्पादनांना जीआय मानांकन दिल्याचे प्रमाणपत्र दिले जाते.

गोव्याच्या या पदार्थांना मिळाला आहे जीआय टॅग

गोव्यातील खोला मिरची, हरमल मिरची, काजू फेणी, मयंडोळी केळी आणि गोवन खाजे अशा पाच वस्तूंना यापुर्वी जीआय मानांकन मिळालेले आहे.

जीआय मानांकन म्हणजे काय?

विशिष्ट भागात एखादे उत्पादन घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. जीआय म्हणजे जीओग्राफिकल इंडिकेशन. म्हणजे विशिष्ट भौगोलिक ओळख. हा टॅग मिळालेली गोष्ट अथवा उत्पादन संबंधित ठिकाणची मूळ गोष्ट किंवा उत्पादन असल्याचे मानले जाते.

जीआय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे विविध ठिकाणी उत्पादित होणारे एकच उत्पादन वेगवेगळ्या गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी हे मानांकन महत्त्वाचे ठरते.

जीआय टॅगचे महत्त्व

एखाद्या उत्पादनाला जीआय मानांकन मिळाल्यास त्याचे उगमस्थान निश्चित होते. त्याचा फायदा उत्पादकांना मिळतो. कारण त्या उत्पादनाचे नाव इतर कुणी वापरू शकत नाही. उत्पादकांना संबंधित उत्पादनाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठीही त्याचा लाभ होतो.

जीआय मानांकनामुळे उत्पादकाला अनेक लाभ मिळतात. संबंधित उत्पादनाचे नाव इतरांना वापरता येत ना ही तसेच या उत्पादनाची बनावट निर्मिती आणि विक्रीस आळा बसू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: भाजपने गोव्याला केले ‘नशायुक्त’ राज्य; भाजप सरकारवर काँग्रेसचा घणाघाती आरोप

Horoscope: गुरुवार ठरणार खास! 'या' राशींना नोकरी-व्यवसायात मोठं यश, धनलाभ आणि प्रगतीचे प्रबळ संकेत

Goa Fast Track Immigration: गोव्यात सुरू होणार 'फास्ट ट्रॅक इमिग्रेशन'; गृहमंत्री अमित शहा आणि पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Arpora Nightclub Fire: कोर्टाचा आदेश धुडकावणे सचिवांना पडले महाग! बर्च अग्निकांड प्रकरणी 4 ग्रामपंचायतींने उत्तर दाखल न केल्याने हजेरीचे निर्देश

Meta Apology: मोदी सरकार आक्रमक होताच मार्क झुकेरबर्ग नमले! पंतप्रधान मोदींचा व्हिडिओ हटवल्याप्रकरणी अन् बाललैंगिक मजकुरावर 'मेटा'कडून माफी

SCROLL FOR NEXT