पणजी: राज्यात पावसाने उसंत घेतली असून पुढील पाच दिवस राज्यात अशीच स्थिती राहणार आहे. तुरळक सरी वगळता मोठा पाऊस होणार नाही, असा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तविला आहे. सोमवारी तापमानात थोडी वाढ झाली. (There will be no rain in Goa for the next five days.)
पाऊस उघडल्यामुळे शेतकामांना अनुकूल वातावरण असल्याने शेतकरी उत्साही आहेत. सकाळच्या सत्रात काही काळ पाऊस झाला. पेडणे, वाळपई आणि सत्तरी परिसरात मात्र दिवसभर तुरळक रिपरीप सुरू होती. पुढील दोन दिवसात वादळी वारेही ओसरल्यामुळे समुद्रातील वातावरण शांत राहणार आहे, अशी माहिती वेधशाळचे एम. राहुल यांनी दिली.
भर पावसात सूर्याचा लख्ख प्रकाश
पावसाने विश्रांती घेतल्याने सोमवारी गोमंतकीयांना उबदार उन्हात न्हावून घेता आले. उल्लेखनीय म्हणजे, भर पावसाळ्यात सर्वात मोठ्या दिवशी सूर्यदर्शनाचा लाभ गोमंतकीयांना झाला. 21 जून हा मोठा दिवस तशी रात्र लहान असते. हा दिवस 12 तासांऐवजी 13 तास 3 मिनिटांचा होता तर रात्र 10 तास 57 मिनिटांची होती. आजपासून दिवसाचे तास कमी कमी होत जात रात्रीचे तास वाढत जाणार आहेत. 22 सप्टेंबर रोजी दिवस व रात्र यांच्या तासांची वाटणी सारखीच असेल. तेथून 21 डिसेंबरपर्यंत रात्रीचे तास वाढत जाणार आहेत.
पृथ्वी सूर्याभोवती फिरत असतानाचा तिचा वेग आणि कक्षेतील पृथ्वीचे सूर्यासमोरचे स्थान यामुळे रोजचा दिवस आणि रात्रीचा कालावधी वेगवेगळा असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेगामुळे 21 जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा ठरतो. आज सामान्यपणे दिवसातील 24 तासांपैकी 13 तासांहून अधिक काळ दिवस असतो. म्हणूनच हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस ठरतो.
काही देशांत सणासारखा
काही देशांत 21 जून हा दिवस एखाद्या सणासारखादेखील साजरा केला जातो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी प्रति तास वेगाने सुमारे 89 कोटी 40 लाख किलाेमीटर लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील 21 जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस 22 डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.
हा बदल एकाएकी नव्हे
ठरल्यावेळी उठायचे, कामावर जायचे, दुपारचे जेवण करायचे, घरी परतायचे, रात्रीचे जेवण करायचे व झोपायचे. प्रत्येकाचे असे वेळापत्रक ठरून गेलेले असते. मात्र आज जादा वेळ मिळाल्याचे बहुतेकांना कामाच्या व्यापात लक्षातही आले नसेल. हा बदल एकाएकी झाला नव्हता तर गेले काही दिवस दिवसाचे तास वाढत होते त्यामुळे ते तसे लक्षात येणेही शक्य नव्हते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.