Margao Accident Dainik Gomantak
गोवा

Margao Accident: मडगावातील 'त्या' वीज-धक्का मृत्यू प्रकरणाची अद्याप चौकशी नाहीच

प्रशासनाकडून चौकशीस विलंब

गोमन्तक डिजिटल टीम

Margao Accident कचरा गोळा करण्यासाठी म्हणून गेल्या ठिकाणी विजेचा धक्का लागून एका मजुराचा हल्लीच मडगाव बाजारात जुन्या हरी मंदिराजवळ मृत्यू झाला. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते.

पण या घटनेस जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले तरी चौकशी सुरूच आहे. या प्रकरणाची वीज खाते, पोलिस खाते, मडगाव नगरपालिका या तिघांनाही अजुन चौकशी पुर्ण करता आलेली नाही, असे कळते.

पोलिस खात्याने वीज खात्याला या मजुराला वीजेचा धक्का कसा लागला, याचा अहवाल सादर करण्यास सांगितल्याचे कळते. पोलिसांना या घटनेची सीसीटीव्ही फुटेज मिळाली आहेत का, असाही प्रश्र्न उपस्थित होत आहे.

ही घटना आजुबाजुच्या इमारतीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधुन पाहिजे तेवढी माहिती मिळवल्याचे पोलिस उपअधिक्षक संतोष देसाई सांगतात.

वीज खात्याकडुन अहवाल येत नाही, तोपर्यंत पुढील तपासणी करणे शक्य नाही, असेही देसाई यांनी स्पष्ट केले. हा तांत्रिक अडचणीचा प्रश्र्न आहे. ज्या ठिकाणी घटना घडली तिथे जिवंत वीजवाहिनी कशी होती? हा प्रश्र्नही उपस्थित होतो, असे सांगुन देसाई यानी सांगितले की वीज खात्याकडुन अहवाल मागितला आहे.

बेकायदेशीर जाहिरात फलक

या घटनेची कसुन चौकशी व्हायला हवी, अशी नागरिकांकडुन मागणी होत आहे. शिवाय घटनेच्या ठिकाणी विद्यार्थी शौचासाठी पण कधी कधी जातात. तसेच नगरपालिकेचे मजुर कचरा गोळा करण्यासाठी जातात.

ही वाहिनी जाहिरात फलकातुन खाली आली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तिथे असलेल्या सर्व जाहिरात फलकांना नगरपालिकेची परवानगी नसल्याचेही उघड झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT