IMD Goa Rain Forecast
IMD Goa Rain Forecast  Dainik Gomantak
गोवा

IMD Goa: गोव्यात आगामी 3 दिवस पावसाची शक्यता; गोवा वेधशाळेचा अंदाज

Akshay Nirmale

IMD Goa Rain Forecast: मे महिन्याची अखेर येत असताना आता देशभरात अनेक ठिकाणी वळीवाचा पाऊस पडत आहे. गोव्यात काही ठिकाणी गेल्या काही दिवसांमध्ये अशा पावसाने हजेरीही लावली.

आता रविवारी 28 मे, सोमवारी 29 मे आणि मंगळवारी 30 मे रोजी वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तवली आहे. अर्थात राज्याच्या काही भागातच पाऊस पडेल.

नैऋत्य मॉन्सून अंदमानात दाखल झाला असून 4 जून केरळमध्ये मॉन्सूनला सुरवात होणार आहे. तर गोव्यात 8 ते 10 जून दरम्यान, मॉन्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यापुर्वी रविवारी 28 मे, सोमवारी 29 मे आणि मंगळवारी 30 मे रोजी वीजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या दोन दिवसांमध्ये समुद्र खवळलेला असण्याची शक्यता असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन मच्छिमारांना करण्यात आले आहे.

दरम्यान, यंदाचा मासेमारीचा हंगाम 30 मे पर्यंत असणार आहे. 1 जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद ठेवण्याचे आवाहन यापुर्वीच करण्यात आलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SBI FD Interest Rates: एसबीआयच्या करोडो ग्राहकांचे बल्ले-बल्ले, आजपासून नवीन व्याजदर लागू; जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ?

Goa Indore Flight: खराब हवामानाचा फटका! एक तास हवेत घिरट्या घालत होतं विमान; प्रवाशांचा जीव टांगणीला

SCROLL FOR NEXT