Water Problem In Saleli  Dainik Gomantak
गोवा

Water Problem In Saleli : सालेलीत पाण्यासाठी वणवण; अनेक दिवसांपासून नळाला पाणी नाही

सत्तरी जलसंपदा लोकाधिकार मंचाने जाणून घेतली महिलांची समस्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

Water Problem In Saleli: सत्तरी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. होंडा ग्रामपंचायत क्षेत्रातील सालेली गावात मागील अनेक दिवसांपासून नळाला पाणी येत नसल्‍यामुळे लोक हैराण झाले आहेत. काही वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो, पण तो खूपच अपुरा पडतो.

या समस्‍येची दखल घेऊन सत्तरी जलसंपदा लोकाधिकार मंचतर्फे सालेली गावात जाऊन महिलांकडून समस्‍येची तीव्रता जाणून घेण्‍यात आली. यावेळी मंचचे प्रमुख रामनाथ वरक, भैरू वरक आदींची उपस्थिती होती.

रामनाथ वरक म्हणाले, सत्तरी जलसंपदा मंच नवीनच स्थापन करण्यात आला आहे. मंचतर्फे सत्तरीतील अनेक प्रश्‍‍नांवर आवाज उठविण्‍यात येत आहे. कोणत्या गावात पाण्याची समस्या आहे याची माहिती घेऊन त्याविषयी वाळपई पाणीपुरवठा विभागाला निवेदने दिली जात आहेत.

सालेलीतील महिलांच्‍या स्‍वाक्षरीचे निवेदन पाणीपुरवठा विभागाचे साहाय्यक अभियंत्‍यांना देऊन समस्या सोडविण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी पावले उचलण्याची मागणी केली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT