Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

सुदिन ढवळीकरांच्या मगोशी हात मिळवणी करण्याचा प्रश्नच नाही : मनोज परब

भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मागच्या 20 वर्षात गोव्याची वाट लावली. या भ्रष्ट पक्षांना पर्याय म्हणून समविचारी प्रादेशिक पक्षांनी युती करून येणारी निवडणूक लढविली पाहिजे असा प्रस्ताव सुदिन ढवळीकर यांनी मांडला होता.

दैनिक गोमन्तक

मडगाव: मागच्या 17 वर्षात आलेल्या प्रत्येक सरकारला साथ देणाऱ्या सुदिन ढवळीकरांच्या (Sudin Dhavalikar) मगो पक्षाशी युती करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे रेवुल्युशनरी गोवा (आरजी)चे मनोज परब (Manoj Parab) यांनी व्यक्त करताना काँग्रेस आणि भाजप पक्षाने (BJP) गोव्याची (Goa) वाट लावली असेल तर त्यांना त्यावेळी ढवळीकर बंधूंचीही साथ होती असा आरोप त्यांनी केला.

भाजप (BJP) व काँग्रेस (Congress) या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी मागच्या 20 वर्षात गोव्याची वाट लावली. या भ्रष्ट पक्षांना पर्याय म्हणून समविचारी प्रादेशिक पक्षांनी युती करून येणारी निवडणूक लढविली पाहिजे असा प्रस्ताव सुदिन ढवळीकर यांनी मांडला होता. जर आरजी सारखे पक्ष पुढे आल्यास आम्ही त्यांच्याशीही युती करण्यास तयार आहेत असे सुदिन ढवळीकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केले होते. या प्रस्तावाला उत्तर देण्यासाठी आज मडगाव (Madgaon) येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत परब यांनी मगो पक्षावर टीका करताना, काँग्रेस व भाजपा हे जर भ्रष्ट पक्ष होते तर मगोने त्यांना साथ का दिली असा सवाल त्यांनी केला.

सुदिन ढवळीकर याना कुठल्याही परिस्थितीत आपण कधी तरी मुख्यमंत्री होऊ असे वाटते. त्यामुळेच त्यांनी आता हे प्रादेशिक युतीचे नवे गाजर पुढे आणले आहे असा आरोप केला. ढवळीकर हे आपण गोवेकारांसाठी वावरले असा दावा करत असले तर त्यांनी ते सत्तेत असताना त्यांनी काय काम केले त्याची माहिती लोकांसमोर मांडावी असे आवाहन त्यांनी दिले. ढवळीकर बंधूनी लोकांचे भले फारसे केले नाही उलट त्यांना मदत करण्याच्या बहाण्याने लाचार करून सोडले असे ते म्हणाले.

येत्या निवडणुकीत आरजी पक्ष कुणाशीही युती न करता सर्व 40 मतदारसंघात निवडणूक लढविणार आहे. आम्ही 28 मतदारसंघात यापूर्वीच कामाला सुरुवात केली आहे. आरजीला राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी निवडणूक आयोगाकडे सादर केलेला अर्ज शेवटच्या टप्पात असून ऑगस्ट पर्यंत आरजीला राजकिय पक्ष म्हणून मान्यता मिळणार आहे. ही मान्यता मिळाल्यावर सर्व मतदारसंघात आम्ही काम सुरू करू असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रशांत पागी, सेबी फेर्नांडिस, तियोतीन डिकॉस्ता हे अन्य सदस्य उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT