Dinesh Gundu named party in charge of Goa
Dinesh Gundu named party in charge of Goa Dainik Gomantak
गोवा

गोवा काँग्रेसधील धुसफूस संपेना; 5 आमदारांना चेन्नईला हलवले

Sumit Tambekar

गोवा काँग्रेसमध्ये गेले काही दिवस नाराजी नाट्य सुरु आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिगंबर कामत यांनी याबाबत आपली नाराजी स्पष्ट केली होती. यातच आता गोवा काँग्रेसच्या पाच आमदारांना चेैन्नईला हलवल्याने या दौऱ्यावरुन गोव्यातील राजकिय पटालावर चर्चेला उधान आले आहे.

चेन्नईला हलवलेल्या पाच आमदारांमध्ये संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रुडॉल्फ फर्नांडिस, एल्टन डिकॉस्टा आणि कार्लोस फेरेरा या 5 आमदारांचा समावेश आहे. त्यांना चेन्नईला हलवले असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत काँग्रेस नेत्यांना विचारले असता. सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं आहे. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदारांनी भाजपशी संधान न साधता काँग्रेसशी निष्ठा कायम राखावी यासाठी गोवा काँग्रेसने ही अधिकची काळजी घेतली आहे. अशी माहिती समोर आली आहे.

गोमंतक प्रतिनीधींनी याबाबत चैन्नई दौऱ्यावर असणाऱ्या आमदारांशी संपर्क साधला असता, गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांच्याशी महत्त्वाची चर्चा करावयाची असल्याने आम्हाला चैन्नई दौरा करावा लागला. अशी माहिती दिली. आहे. असे असले तरी काही नेत्यांनी याबाबत खाजगीत बोलताना गोवा काँग्रेसमध्ये सुरु असलेली धुसफूस अद्याप संपलेली नाही. सर्वच नेत्यांना पक्षातील अंतर्गतबाबींवर आक्षेप असल्याचं म्हटले आहे. त्यामूळे या नेत्यांशी चर्चा करुन चर्चेने मार्ग काढला जाणार असल्याचं सांगितले जात आहे. मात्र या निमित्ताने गोवा काँग्रेसमधील अंतर्गत अद्याप संपवली नसल्याचं स्पष्ट झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: लईराई देवीचा जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा; भाविकांचा लोटला महापूर

Netravali: कदंबच्या 'त्या' कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करणार : वनमंत्री राणे

Yellow Alert In Goa: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Mukesh Ambani: मुकेश अंबानी लवकरच करणार 150 अब्ज डॉलर्सच्या मार्केटमध्ये एन्ट्री? ‘या’ क्षेत्रात आजमावणार हात

गोव्यात लवकरच AI द्वारे होणार फुफ्फुसाच्या कर्करोगाची तपासणी, आरोग्य मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT