Pramod Sawant in Church Statement  Dainik Gomantak
गोवा

चर्चबाबत कोणतंही वादग्रस्त वक्तव्य नाही, मुख्यमंत्र्यांनी आरोप फेटाळले

माझ्या विधानाचा विपर्यास करून हा मुद्दा चर्चेत आणला; प्रमोद सावंत

दैनिक गोमन्तक

विधानसभा निवडणुकीला आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. गेल्या काही दिवसात प्रमुख राजकीय पक्षांचे केंद्रातील नेते गोव्यात प्रचारासाठी दाखल झाले आहेत. त्यांनी दारोदारी जाऊन आपल्या उमेदवारांसाठी प्रचार केला. प्रचार भाषणामध्ये नेत्यांनी आपल्या विरोधकांवर सणसणीत टीका-टिप्पणी देखील केली. यासगळ्यात चर्चेचा विषय ठरले ते मुख्यमंत्री प्रमोद सावंत. (Pramod Sawant) त्यांनी आज दैनिक गोमंन्तकशी दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांना काही प्रश्न विचारण्यात आले. त्यांची त्यांनी उत्तरे दिली.

मुख्यमंत्र्यांनी चर्चबाबत (Church) केलेले विधान काही कालावधीपूर्वी खूप चर्चेत होतं. त्यावर त्यांना विचारले असता प्रमोद सावंत म्हणाले की, चर्च बद्दल मी काही चुकीचं बोललो नव्हतो, तेव्हा चर्च पाडण्याची माझी भावना नव्हती. आणि इथून पुढेही नसेल माझं विधान असं होतं की ज्या ठिकाणी मंदिर, चर्च पडले आहेत. तसेच जिथे काहीच नाही अशा ठिकाणी नवीन मंदिर (Temple) बांधायला काहीच हरकत नाही. पण यामुळे माझ्या कुणाच्याही भावना दुखावण्याची इच्छा नव्हती. काही पत्रकारांनी माझ्या विधानाचा विपर्यास करून हा मुद्दा चर्चेत आणला. त्यामुळे मी त्या वेळीही हेच सांगितलं होतं आणि आताही मी हेच सांगत आहे की मी चर्चबाबत कोणतचं चुकीचं विधान केलं नव्हतं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 6 स्टार खेळाडूंना डच्चू, कोहली- बुमराहचं कमबॅक

Monsoon Update: पावसाची चाहूल; 22 आणि 23 जूनला अनेक भागांत पावसाचा अंदाज, यलो अलर्ट जारी

Land Fraud Case: अंबेशी येथील जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांची फसवणूक, जमीनमालकाची वाळपई पोलिसांत तक्रार दाखल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 3% वाढीची शक्यता; पगारवाढ कधीपासून लागू होणार?

Karapur Mega Project: कारापूर प्रकल्प विरोधातील आंदोलन तापण्याची शक्यता, पायवाटांवरून पुढे केलेल्या अटी ग्रामस्थांना अमान्य

SCROLL FOR NEXT