Night curfew

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यातही नाईट कर्फ्यू लागू करावा, पण...

पर्यटन क्षेत्रातील (Tourism) व्यावसायिक निदान 1 तारखेपर्यंत तरी हा निर्णय घेतला जाऊ नये अशी मागणी करत आहेत.

दैनिक गोमन्तक

मडगाव: गोव्यात (Goa) वाढलेली पर्यटकांची गर्दी, त्यातच त्यांचे अनिर्बंध वागणे आणि गोव्यात आढळून आलेला ओमीक्रोनचा रुग्ण या पार्श्वभूमीवर गोव्यात कर्नाटक महाराष्ट्राप्रमाणे (Maharashtra) रात्रीचा कर्फ्यू लागू करा अशी मागणी स्थानिकांकडून होऊ लागली आहे. मात्र पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक निदान 1 तारखेपर्यंत तरी हा निर्णय घेतला जाऊ नये अशी मागणी करत आहेत.

गोव्यात (Goa) कोविडचे रुग्ण वाढू लागले असून सोमवारी जी सरकारी आकडेवारी जारी झाली आहे त्यात सक्रिय रुग्णांची संख्या 465 वर पोहोचली होती. सध्या गोव्यातील समुद्र किनारे पर्यटकांनी ओसंडून वाहत आहेत. मडगावातील डॉक्टर व्यंकटेश हेगडे (Venkatesh Hegde) यांनी गोव्यात कोविडचे रुग्ण वाढत आहेत ही चिंतेची बाब असून गोव्यात येणारे पर्यटक मास्कचा वापर करत नाहीत. अशावेळी कोविडचा राज्यात पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता आहे. या पर्यटकांवर निर्बंध आणण्यासाठी रात्रीच्यावेळी कर्फ्यु (Night curfew) सुरू करणे अती आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

मडगावातील व्यावसायिक संदेश पै यांनीही अशा कर्फ्यूची आवश्यकता आताच आहे. जर तो सुरू करण्यास उशीर केला तर स्थिती हाताबाहेर जाण्याची भीती व्यक्त केली. सध्या गोव्यात जे पर्यटक येतात त्यांचा वावर अनिर्बंधित असल्याने सरकारने कडक पाऊले उचलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

पै म्हणाले, कर्नाटक आणि महाराष्ट्रात कोविड रुग्ण वाढल्याने तिथे रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. गोवा हे या दोन्ही राज्याच्या मध्ये असून या दोन्ही राज्यातून मोठ्या प्रमाणावर लोक गोव्यात येत असतात. यातील काहीजण कोविड बाधीतही असू शकतात त्यामुळे त्यांच्यावर कडक निर्बंध लादणे अत्यंत गरजेचे असे ते म्हणाले.

मात्र पर्यटन व्यवसायातील व्यावसायिक निदान 1 जानेवारी पर्यंत हे निर्बंध नकोत अशी मागणी करत आहेत. स्वतः पर्यटन व्यवसायात असलेले काणकोणचे नगराध्यक्ष सायमन रिबेलो यांनी 1 जानेवारी पर्यंत तरी असे निर्बंध नकोत अशी मागणी केली. रिबेलो म्हणाले, मागच्या दोन वर्षात कोविडमुळे पर्यटन व्यावसायिक कसलाच धंदा करू शकले नाहीत. यावेळी प्रथमच पर्यटक गोव्यात आले आहेत. अशा वेळी रात्रीचे निर्बंध घातल्यास पर्यटन व्यावसायिकांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्या सारखे होईल असे ते म्हणाले. ज्या पर्यटकाने कोविड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना राज्यात यायला द्यायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

VIDEO: 'भगवान श्रीकृष्ण दिवसातून पाच वेळा नमाज पठण करायचे', मौलाना जरजिस अंसारीचा खळबळजनक दावा; हिंदू संघटना आक्रमक

Nicholas Pooran Century: 13 षटकार, 5 चौकार, 321 चा स्ट्राइक रेट… निकोलस पूरननं ठोकलं वादळी शतक; गोलंदाजांची काढली पिसं VIDEO

Shukra Gochar 2026: नशिबाची साथ अन् अफाट पैसा! शुक्राचा स्वतःच्याच नक्षत्रात महाप्रवेश! 'या' 5 राशींचे नशीब पालटणार; राजासारखे जीवन जगणार

SCROLL FOR NEXT