Shankar Mahadevan Dainik Gomantak
गोवा

Shankar Mahadevan: प्रसिद्ध संगीतकार, गायक शंकर महादेवन यांनी गोव्याबद्दल व्यक्त केली मोठी खंत

विद्यार्थ्यांना ऑनलाइन भारतीय संगीत शिकवणाऱ्या संगीत अकादमीचे संस्थापक, पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून शंकर महादेवन यांचे संगीत क्षेत्रात मोठे नाव आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अपंग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने दिव्यांगजन आयोग, समाज कल्याण संचालनालय आणि गोवा मनोरंजन संस्था यांच्या सहकार्याने होत असलेल्या पर्पल फेस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात काल सुरुवात झाली. आयनॉक्स परिसरात झालेल्या उद्‌घाटन सोहळ्यास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या सोहळ्याला प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांनीही उपस्थिती लावली होती. शंकर महादेवन हे अलीकडच्या काळातील सर्वात यशस्वी गायक आणि संगीतकारांपैकी एक आहेत.  जगभरातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन भारतीय संगीत शिकवणाऱ्या शंकर महादेवन अकादमीचे संस्थापक, भारतीय पार्श्वगायक आणि संगीतकार म्हणून शंकर महादेवन यांचे संगीत क्षेत्रात मोठे नाव आहे.

पर्पल फेस्ट सोहळ्यादरम्यान शंकर महादेवन यांनी आपले विचार मांडले. महादेवन म्हणाले,  संगीत प्रेमी विद्यार्थ्यांसाठी गोव्यात संगीत शिकण्यासाठी योग्य सुविधा नाहीत, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थी येऊन संगीत शिकू शकतील अशा सुविधा असणं हे महत्वाचं आहे. अशा दर्जेदार सुविधा असणं फार गरजेचं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT