Goa Rent a Cab Dainik Gomantak
गोवा

Goa Rent a Cab : 4 हजार 957 रेंट ए कॅब सेवेत; दहा संस्थांकडे परवाना

इतर फ्रँचाईजींच्या चार हजारांवर कारगाड्या

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्यात 4 हजार 957 रेंट ए कॅबच्या कार सेवेत आहेत. दहा संस्थांकडे कॅब चालविण्याचा परवाना असून त्यात बार्देश तालुक्यात पाच, सासष्टीत तीन, तर पेडणे, तिसवाडी आणि फोंडा येथे प्रत्येकी एक असा सरकारी परवानाधारकांचा समावेश असल्याची माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी लेखी उत्तरात दिली आहे.

हळदोण्याचे आमदार कार्लोस फेरेरा यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमध्ये मंत्री गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीतून राज्यातील रेंट ए कॅब चालविणाऱ्या संस्थांविषयीची सविस्तर माहिती स्पष्ट होते.

आमदार फेरेरा यांनी रेंट-ए-कॅब चालविण्याचा परवाना असलेल्या सरकारकडे नोंदणीकृत एजन्सी/कंपन्या/आस्थापनांची संख्या, आरटीओ कार्यालयनिहाय आणि तालुकानिहाय तपशीलात आस्थापनाचे नाव, पत्ता, मालकाचे नाव, परवानगी देण्याची तारीख, मालकीच्या कारची संख्या, वाहनाचा प्रकार, भाड्याने कॅब परवाना जारी करण्यावर सरकारच्या स्थगितीची सद्यस्थिती असे प्रश्‍न विचारले होते.

या प्रश्नावर दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट होते की, सरकारकडे नोंदणीकृत असलेल्या एजन्सी तथा आस्थापनांमध्ये सात खासगी आस्थापनांचा, तर तीन संघटनांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: तिकीट अन् राजकीय चर्चा..!

US Shopping Mall Shooting: अमेरिकेत शॉपिंग मॉलमध्ये अंधाधुंद गोळीबार; तिघांचा मृत्यू, पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार Watch Video

RGP Goa Internal Differences: 'आरजी'मधील वादामुळे लोकांचा झाला भ्रमनिरास; वीरेश बोरकर गोवा राखण्यासाठी करणार युती?

Goa Politics: युतीच्या चर्चेला मुहूर्त, विजय-गिरीश यांची मडगावात भेट; जागावाटपावर मात्र 'ब्र'ही नाही

Peru Tourist Plane Crash: पेरूमध्ये भीषण दुर्घटना! पर्यटकांना घेऊन जाणारं विमान कोसळलं; पायलटसह 13 जणांचा दुर्दैवी मृत्यू VIDEO

SCROLL FOR NEXT