Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

उत्तर प्रदेशाप्रमाणेच गोव्यातही आढळू शकतात मंदिराचे अवशेष, सर्वेक्षणाची गरज: सुदिन ढवळीकर

सुदिन ढवळीकर: उत्तर प्रदेशमधील घटनेकडे वेधले लक्ष

दैनिक गोमन्तक

पणजी: उत्तर प्रदेश येथील ज्ञानवापी मशिदीमध्ये शिवलिंगचे अवशेष आढळून आले आहेत, त्या प्रमाणे असे अवशेष गोव्यातही आढळून येऊ शकतात. म्हणून पुरातत्व खात्याने यासाठी सर्व्हे करून चाचणी करावी, अशी मागणी वीज मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केली.

ढवळीकर म्हणाले की, ‘हा पुरातत्व खात्याने हाताळण्याचा विषय आहे. गोव्यातील ज्या मोठा मंदिरांचा तसेच धार्मिक स्थळांचा 1410 नंतर पाडाव झाला, तेथे तपासणी करण्याची गरज आहे. जसे उत्तर प्रदेशतील ज्ञानव्यापी मशिदीमध्ये शिवलिंग आढळून आले, तेथेही आढळू शकतात. त्यामुळे या मंदिराचा, धार्मिक स्थळांचा सर्व्हे करण्याचा निर्णय संबंधीत खात्याने घ्यावा’ असेही त्यांनी स्पष्ट केले

मंत्री ढवळीकर म्हणाले, की ज्या धार्मिक स्थळांचा पाडाव झाला, तेथे सर्व्हे झाल्यास नक्कीच तेथे अशा गोष्टी सापडू शकतात. मात्र, त्यासाठी भारतीय पुरातत्व खाते तसेच गोवा पुरातत्व खात्याने एकत्रपणे काम करण्याची गरज आहे. पोतुगिज काळात जी मंदिरे लुप्त झाली होती, त्या मंदिरांची पुनर्बांधणी केली जाईल असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ही मंदिरे पुन्हा उभारावी, हे माझे वैयक्तिक मत नसून सर्वाचीच तशी भावना आहे’ असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश येथील नागरिकांच्या मागणीनंतर ज्ञानव्यापी मशिदीचा सर्व्हे करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT