Theft in Shri Dev Bodgeshwar Temple Dainik Gomantak
गोवा

Shri Dev Bodgeshwar: म्हापशातील जागृत देवस्थान असलेल्या श्री बोडगेश्वर मंदिरात चोरी! मात्र सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे...

Mapusa Theft Case: राज्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

Kavya Powar

Theft in Shri Dev Bodgeshwar Temple

राज्यातील मंदिरांमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यातच म्हापशातील जागृत देवस्थान असलेल्या श्री बोडगेश्वर देवस्थानात आज (ता. 28) पहाटे चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

उपलब्ध माहितीनुसार, या मंदिराच्या प्रांगणात असलेल्या काचेच्या पेटीत पादुका असून इथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून यात पैसे अर्पण केले जातात. दोन चोरांनी ही पेटी फोडल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी पैसे चोरण्यासाठी चोरांनी पेटीवरील काच काठीच्या मदतीने फोडली.

चोर पेटीतले पैसे लंपास करणार इतक्यातच तिथे असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या सदर प्रकार लक्षात आला. रक्षकाच्या सतर्कतेमुळे त्यांचा चोरीचा डाव फसला. सुरक्षा रक्षक आल्यामुळे चोरांना तिथून पळ काढावा लागला. तपासाअंती पेटीतील 6 हजार चोरीला गेल्याचे कळते.

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे चोर फुटपाथवर राहणारे असून संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरू असून याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

गेल्या महिन्यातच श्री देव बोडगेश्वराच्या 89 व्या महान जत्रोत्सवास संपन्न झाला. 24 जानेवारीपासून सुरुवात झालेल्या या जत्रोत्सवाची सांगता 4 फेब्रुवारीला झाली. बोडगेश्वराला यंदा हातातील सोन्याचे कडे तसेच पायातील चांदीचे कडे अर्पण करण्यात आले होते. आजच्या घटनेने भाविकांच्या भावना दुखावल्या असून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Benaulim: सफर गोव्याची! मध्यरात्री घोड्यांच्या टापांचा आवाज येण्याची दंतकथा, रूपेरी वाळूचा समुद्रकिनारा लाभलेले 'बाणावली'

IND vs NZ 2nd ODI: किंग कोहलीचा 'विराट' फॉर्म! सेहवाग आणि पॉन्टिंगचा रेकॉर्ड मोडण्याची सुवर्णसंधी; न्यूझीलंडविरुद्ध रचणार नवा इतिहास?

Makar Sankranti Wishes in Marathi: तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला... मकरसंक्रांतीच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Goa Winter Session: ऐन लग्नात संगीत बंद पाडणाऱ्यांची आता खैर नाही! कॉपीराइटच्या नावाखाली होणारी दादागिरी थांबणार; मुख्यमंत्री सावंत यांची विधानसभेत मोठी घोषणा

Surya Shani Yuti 2026: कर्माचा हिशोब अन् सत्तेचा अहंकार...! सूर्य-शनि युतीचा 'रक्ताच्या नात्यांवर' होणारा मोठा परिणाम; 'या' राशींसाठी धोक्याची घंटा

SCROLL FOR NEXT