Sanguem Temple Theft 
गोवा

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Sanguem Temple Theft: चोरट्यांनी मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा तोडून श्री विठ्ठल-रखुमाई देवासमोर असलेली चांदीची प्रभावळ काढून पळ काढला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanguem Temple Theft

राज्यात मंदिरांमधील चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबलेले नाही. हल्लीच बोडगेश्वर मंदिरात मोठी चोरी झाली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री सांगे येथील विठ्ठल मंदिरात दोघा चोरांनी चार लाखांचा ऐवज लंपास केला.

शुक्रवार, १० रोजी रात्री १.३० वाजता दोन चोरांनी मंदिरात प्रवेश करून सुमारे पाच किलो वजनाची चांदीची सुमारे चार लाख रुपये किमतीची प्रभावळ चोरून नेली. चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सांगे पोलिस चोरांच्या शोधात आहेत.

सांगे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री १.३० वा. दोन चोरांनी मंदिराचा मुख्य दरवाजा तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या गर्भगृहाचा दरवाजा तोडून श्री विठ्ठल-रखुमाई देवासमोर असलेली चांदीची प्रभावळ काढून पळ काढला.

दत्तप्रसाद सांगेकर यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली असता पोलिस घटनास्थळी आले, तसेच मंदिर समिती व गावातील लोकांनी मंदिराकडे धाव घेऊन चोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण ते त्यांच्या हाती लागले नाहीत.

चोरांचा शोध घेण्यासाठी ठसेतज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण केले होते. सांगे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

पाठलाग करणाऱ्यांवर दगडफेक

यावेळी मंदिराशेजारीच राहणाऱ्या दत्तप्रसाद सांगेकर यांना कसला तरी आवाज आल्याने त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, दोन अज्ञात व्यक्ती काहीतरी घेऊन जात असल्याचे त्यांच्या नजरेस आले.

त्यांना पकडण्यासाठी ते मागे गेले असता, चोरांनी त्यांच्यावर दगडफेक केल्याने त्यांनी माघारी येऊन मंदिरात पाहिले असता त्यांना मंदिराचा आणि गर्भगृहाचा दरवाजा तोडल्याचे लक्षात आले.

फंडपेटी, कपाटातील ऐवज सुरक्षित

चोर चांदीची प्रभावळ घेऊन पसार झाले; पण त्यांनी फंडपेटी तसेच आतील कपाटाला हात लावला नाही. कपाटात मंदिराच्या उत्सवात वापरात येणाऱ्या सुमारे आठ लाख रुपये किमतीच्या चांदीच्या मूर्ती आणि मुखवटे होते, असे देवस्थानचे सदस्य नारायण मसुरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 16 September 2026: नशिबाची साथ अन् अचानक जॅकपॉट! आज 'या' राशींच्या आयुष्यात घडणार मोठी उलथापालथ; करिअरमध्ये झेप घेण्याची संधी

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

SCROLL FOR NEXT