Mapusa Jewellers Theft News Dainik Gomantak
गोवा

Mapusa Theft: पोलिस गस्त असतानाही चोरट्यांचा धुमाकूळ! वीजखांबावर चढून दागिन्यांवर डल्ला; कोट्यवधींचे दागिने लंपास

Mapusa Theft News: दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असून, चोरटे त्‍यात कैद झाले आहेत; त्‍यांनी शर्ट-पँट घातले होते, तर चेहरे रुमालांनी झाकले होते

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Mapusa Jewellers Theft News

म्हापसा: येथील बाजारातील चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीच्या ‘नास्नोडकर ज्वेलर्स’मधून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी कोट्यवधी रुपयांपेक्षा अधिक सोन्‍या-चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. दुकान फोडून ही चोरी करण्‍यात आली. दरम्‍यान, राज्‍यात चोऱ्या, दरोडे तसेच सोनसाखळी हिसकावण्‍याचे प्रकार वाढले आहेत. गेल्‍या पाच दिवसांत अशा दहापेक्षा जास्‍त घटना घडल्‍या आहेत.

म्‍हापशातील घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. रविवारी मध्यरात्री १२ ते २ यादरम्यान २० ते ३० वर्षे वयोगटातील तिघा चोरट्यांनी डल्ला मारला. दुकानासमोर असलेल्‍या वीजखांबावर चढून संशयित नास्नोडकर ज्वेलर्सच्या पोटमाळ्यावर चढले. तेथील लोखंडी गेट कटरच्या साहाय्याने कापून त्यांनी आतमध्ये प्रवेश केला. शनिवारी (ता. २१) रात्री ८ वाजता नास्नोडकर आपले दुकान बंद करून घरी गेले होते. चोरट्यांनी दोन कापडी पिशव्‍यांत भरून दागिने नेले. तसेच ते श्री मारुती मंदिरापर्यंत चालत गेले.

पोलिस गस्त असताना चोरी झालीच कशी?

पालिका मार्केटमधील चंद्रमोहन नास्नोडकर यांच्या मालकीच्या ‘नास्नोडकर ज्वेलर्स’मधून रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी दुकान फोडून अंदाजे कोट्यवधी रुपयांपेक्षा अधिक सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्‍यानंतर नागरिकांतून आश्‍‍चर्य व्‍यक्‍त करण्‍यात येत आहे. पोलिसांची गस्‍त असताना असे प्रकार होऊच कसे शकतात, असा सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहे.

रात्रीच्या वेळी म्हापसा मार्केट परिसरात गस्त घालण्यासाठी दोन पोलिस तैनात असतात. यात एक पोलिस कॉन्स्टेबल व होमगार्डचा समावेश असतो. मात्र, इतक्या मोठ्या मार्केटसाठी केवळ दोनच पोलिस कर्मचारी, हा संशोधनाचा विषय आहे. तरीही पोलिस गस्तीवर असताना, झालेली ही धाडसी चोरीच म्हणावी लागेल.

दरम्यान, मार्केटच्या प्रवेशद्वारावर गणेशचतुर्थीपूर्वी पोलिस बूथ बसविण्यात आला होता. तिथे चोवीस तास गनमॅन (बंदुकधारी पोलिस) ठेवणार, असे आश्वासन पोलिसांकडून ज्वेलर्स असोसिएशन यांना दिले होते. मात्र, चोरीच्या वेळी त्या बूथमध्ये कुणीच पोलिस नव्हता, असे समजते.

अलार्म नोटिफिकेशन अलर्ट गेला, पण...

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांना अलीकडे नवीन फिचर आले आहेत. त्यानुसार, दुकानातील घडामोडीवर देखरेख मोबाईल किंवा मॉनिटरच्या माध्यमातून ठेवता येते. दुकानात चोर घुसल्याचा ‘अलार्म नोटिफेकेशन अलर्ट’ नास्नोडकर यांना गेलेला. परंतु मध्यरात्रीची वेळ असल्याने त्‍यांच्‍या ते लक्षात आले नाही. दरम्यान, नास्नोडकर यांनी आपल्या सराफा दुकानाचा विमा उतरविला आहे, असे सूत्रांनी सांगितले.

बुरखाधारी चोरटे कॅमेऱ्यात कैद

दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असून, चोरटे त्‍यात कैद झाले आहेत. त्‍यांनी शर्ट-पँट घातले होते, तर चेहरे रुमालांनी झाकले होते. म्हापसा मार्केटमध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे काम सुरू आहे. त्‍याअंतर्गत नवीन लोखंडी वीजखांब बसविण्‍यात येत आहेत. मात्र अद्याप ते सुरू केलेले नाहीत. नास्नोडकरांच्या दुकानासमोरील याच वीजखांबाव चढून चोरटे दुकानाच्या पोटमाळ्यावर चढले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT