theft accused escaped from custody of Vasco Goa police after medical examination has been arrested  Dainik Gomantak
गोवा

Vasco: गोवा पोलिसांना चकमा देऊन पळाला आरोपी; चोरी प्रकरणात होता अटकेत, अखेर...

वैद्यकीय तपासणी करून परत येत असताना संशयित आरोपी पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी झाला.

Pramod Yadav

चोरी प्रकरणात वास्को पोलिसांच्या अटकेत असलेला संशयित आरोपीने पोलिसांना चकमा देऊन पळ काढला होता. वाहनाची काच फोडून त्यातून अडीच लाख चोरी केल्याचा आरोप त्याच्यावर असून, त्याला एप्रिल अखेरच्या आठवड्यात अटक केली होती. दरम्यान, वैद्यकीय तपासणी करून परत येत असताना तो पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी झाला.

पी. रमेश असे या संशयित आरोपीचे नाव असून, त्याला पुन्हा अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी दोन टीम तैनात केल्या होत्या. एक टीम तमिळनाडू येथे त्याच्या लोकेशनवर नजर ठेऊन होती. तर, दुसरी टीम गोव्यात तपास करत होती. दरम्यान, संशयित बेळगावनजिक असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. तो गोव्याच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून, चिखली येथे त्याला अटक केली.

काय आहे प्रकरण?

वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनाची काच फोडून त्यातून अडीच लाख चोरी केल्याप्रकरणी वास्को पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, वास्को पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू करून यातील संशयित आरोपी पी. रमेश याला 27 एप्रिल रोजी पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी याच दिवशी संशयित आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी गोमेकॉत नेण्यात आले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मागे येत असताना तो पोलिसांच्या तावडीतून निसटून पळून गेला. त्यानंतर पोलिस त्याचा चौफेर तपास घेत होते. यासाठी दोन टीम सज्ज करण्यात आल्या. दरम्यान, संशयित आरोपी गोव्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी सापळा रचून त्याला चिखली येथे पुन्हा अटक केली. अशी माहिती वास्को पोलिसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT