Kala Academy Viral Video Dainik Gomantak
गोवा

Kala Academy Viral Video: मंत्र्यांसारखे कला अकादमीचे लाईट्स रंग बदलतात; राजदीपचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Kala Academy Viral Video: कला अकादमीच्या पाठीमागील शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाही, नूतनीकरण केल्यानंतरही कला अकादमीत समस्या असल्याचे राजदीप म्हणाले.

Pramod Yadav

Kala Academy Viral Video

नूतणीकरणापासून कला अकादमी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नूतनीकरणाच्या कामासाठी निविदा प्रक्रिया न राबविल्याने ते खुला रंगमंचाचा भाग कोसळल्यानंतर कला अकादमीच्या कामाच्या दर्जाबाबत शंका उपस्थित करण्यात आली.

आता नाट्य कलाकार राजदीप नाईक यांनी अकादमीतील समस्यांचा पाढाच वाचून दाखवत कला अकादमी पूर्ववत करण्याची मागणी केलीय. तसेच, तसे न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. याचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

70 ते 75 कोटी खर्च करुन कला अकादमीचे नूतनीकरण केल्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे म्हणतात. आणि त्यांना मुख्यमंत्री सावंत देतात. 75 कोटी खर्च करुन कला अकादमीत लावण्यात आलेल्या साऊंड आणि माईक भाड्याने खरेदी केल्यात, ही अवस्था कलाकारांची पंढरी असलेल्या कला अकादमीची केल्या यांना आम्ही कलाकार कधीच माफ करणार नाही. त्यांना गोंयकार आणि इतिहास देखील माफ करणार नाही, असे राजदीप म्हणाले.

कला अकादमीच्या स्टेजवरील लाईट आपोआप बदलतो, सादरीकरण करताना जो काळोख दिसतो तो काळोख या मंत्र्यांनी केलेल्या कर्माचा असल्याची टीका राजदीप यांनी केली.

कला अकादमीच्या अध्यक्ष आणि मुख्यमंत्री यांनी आम्हा लोकांच्या पैशांची वाट लावली असे खंबीरपणाने सांगतो, असे राजदीप म्हणाले.

यावेळी राजदीप नाईक यांनी त्यांनी लिहलेल्या निवेदनाचे वाचन केले. कला अकादमीचे 70 ते 75 कोटी खर्च करुन नूतनीकरण करण्यात आले, तिथे सादरीकरण करताना भाड्याची ध्वनी व्यवस्था आणवा लागते. दिनानाथ मंगेशकर सभागृहातील ध्वनी व्यवस्थेत सुधारणा करावा किंवा त्यासाठी घेतल्या जाणाऱ्या भाड्यात तरी सवलत द्यावी अशी मागणी नाईक यांनी निवेदनाद्वारे केली.

अगोदरची लाईट काढून त्याठिकाणी एलईडी बसविण्यात आलीय, ती सातत्याने रंग बदलत असून, ती नाटकासाठी अजिबात योग्य नाही, असे नाईक म्हणाले. सभागृहातील लाईट मंत्र्यांसारखे रंग बदलत असल्याचा शालजोडीतील टोमणा यावेळी राजदीप यांनी मारला.

ग्रीनरुम मधील देखील लाईट्स बंद पडल्याचे राजदीप यांनी या निवेदनात नमूद केले आहे. अशा अनेक गोष्टी असून, आम्हा कलाकारांना कला अकादमी आहे तशी पूर्ववत करुन द्यावी नाहीतर यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा राजदीप यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT