Theater Workshop  Dainik Gomatnak
गोवा

Theater Workshop : मडगावात १ मे पासून थिएटर कार्यशाळा; १५ प्रशिक्षणार्थींना प्रवेश

Theater Workshop : मोफत थिएटर कार्यशाळा १ मे ते १० मे दरम्यान मडगावातील आबाद फारिया रोडवरील, श्री राम मंदिरासमोरील त्यांच्या लक्ष्मी निवासात आयोजित करण्यात आली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Theater Workshop :

सासष्टी, प्रसिद्ध नाट्यकर्मी, शिक्षण तज्ज्ञ स्व. भिकू पै आंगले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असून यानिमित्त स्व. भिकू पै आंगले शताब्दी समितीने यंदा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मोफत थिएटर कार्यशाळा हा त्यातील एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

मोफत थिएटर कार्यशाळा १ मे ते १० मे दरम्यान मडगावातील आबाद फारिया रोडवरील, श्री राम मंदिरासमोरील त्यांच्या लक्ष्मी निवासात आयोजित करण्यात आली आहे. १ मे रोजी सकाळी ९ ते १२, तर उर्वरीत २, ३, ४, ५, ९ व १० मे असे सहा दिवस दुपारी २.३० ते ५ या वेळेत घेतली जाईल.

या कार्यशाळेत ८ वर्षांवरील केवळ १५ प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाईल.

या कार्यशाळेत प्रसिद्ध कला सादरीकरणातील व थिएटरचे मार्गदर्शक अवधूत सहकारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेत थिएटरचे मूलभूत तंत्र, थिएटर खेळ, सुधारणा, कहाणी, कथा सांगणे व त्यातील नियम या विषयांमध्ये प्रशिक्षण दिले जाईल.

आज मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत हेमंत पै आंगले यांनी ही माहिती देण्यात आली. यावेळी महेश पै काणे, अवधूत सहकारी व नागनाथ शानभाग उपस्थित होते.

थिएटर आर्ट हा महत्त्वाचा विषय असून त्यातून व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. सार्वजनिक ठिकाणी आपले मत निर्भिडपणे मांडण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो, असे अवधूत सहकारी यांनी यावेळी सांगितले. अधिक माहिती व प्रवेशासाठी इच्छुकांनी हेमंत पै आंगले यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT