Honda Grounds Dainik Gomantak
गोवा

Honda News: होंड्यात क्रीडापटूंना ‘अच्छे दिन’

Honda Panchayat: दोन ठिकाणी सुसज्ज मैदानांचे काम प्रगतिपथावर

गोमन्तक डिजिटल टीम

होंडा पंचायत क्षेत्रातील क्रीडापटूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी सध्या दोन ठिकाणी प्रशस्त मैदानांचे काम जोमाने सुरू आहे. यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या नारायणनगर येथील मैदानाचा विकास तसेच होंडा बस स्थानकासमोरील जागेत फुटसाल मैदान यांचा समावेश आहे.

पर्ये मतदारसंघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रात झपाट्याने लोकवस्ती वाढत चालली आहे. त्यामुळे या भागातील नागरिक तसेच युवा वर्गाला अपेक्षित साधनसुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. येथील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी सुसज्ज अशा मैदानांची गरज होती.

नारायण नगरातील पंचायतीच्या मालकीच्या मैदानावर साधनसुविधांचा अभाव असल्याने तेथे विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित करताना आयोजकांना अनेक समस्या भेडसावत होत्या. या मैदानावर साधनसुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली जात होती.

बस स्थानकासमोर फुटसाल मैदान

होंडा बस स्थानकासमोरील वाहतूक खात्याच्या अधिकार ‌क्षेत्रातील मोकळी जागा हस्तांतरित करून त्याठिकाणी या भागातील युवकांसाठी फुटसाल मैदान तयार करण्याचे नियोजन केले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवातही झाली आहे. त्यामुळे होंडा पंचायत क्षेत्रातील क्रीडापटूंना उत्कृष्ट क्रीडा सुविधा मिळणार आहेत. या मैदानांवर लाखो रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

डॉ. दिव्या राणे, आमदार, पर्ये मतदारसंघ

सत्तरी तालुक्यातील युवा वर्गामध्ये क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाचे गुण आहेत; परंतु त्यांना पुरेशा साधनसुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळत नाही. त्यासाठी पर्ये मतदारसंघात शक्य तेथे मैदाने निर्माण करण्यात येतील. नारायणनगर येथील मैदानाचा विकास व नवीन फुटसाल मैदान तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT