Goa: Kalwa fish Dainik Gomantak
गोवा

Goa: कालवांचे ‘तोणाक’ रोज मिळणार ताटात

Goa: मडकईत पैदास केंद्र; स्वयंरोजगाराचीही संधी; गोवा विद्यापीठाचा उपक्रम

Yeshwant Patil

फोंडा : मत्स्यप्रेमी खवय्यांना तृप्त करण्यासाठी राज्यातील रेस्टॉरंटमध्ये (Restaurant) नवनवीन पदार्थांची रेलचेल असते. त्यामुळेच पर्यटक (Tourist) गोव्याच्या प्रेमात (Love in Goa) पडतात. विशेषतः मांसाहारी (Nonvage) पदार्थांत माशांबरोबरच विविध शिंपल्यांचे ‘तोणाक’ ही तर गोमंतकाची खासियत. शिंपल्यांच्या अर्थातच खुबे, शिनाणे याबरोबरच गोव्यातील प्रसिद्ध कालवांचे ‘तोणाक’ तर लाजवाबच. त्यामुळे शिंपल्यांची पैदास करण्यासाठी गोवा विद्यापीठाने (Goa University) पुढाकार घेऊन ‘उन्नत भारत’ उपक्रमांतर्गत मडकई व शिरदोन अशा दोन भागात झुआरी नदीत कालवांची पैदास करण्यासाठी प्रकल्प सुरू केला आहे. शिरदोनबरोबरच मडकईतील हा प्रकल्प आकाराला आला असून कालवांची पैदास बऱ्यापैकी होत आहे. स्थानिकांना स्वयंरोजगारासाठीही हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.

मत्स्यशेती उत्पादन प्रकल्प उपक्रमांतर्गत उन्नत भारत अभियानाच्या सहकार्याने गोवा विद्यापीठाने मडकईतील झुआरी नदीत कालवा पैदास केंद्र सुरू करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. विशेषतः स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या युवकांसह महिला वर्गाचा सहभाग या कालवांच्या मत्स्य शेतीसाठी उपयुक्त ठरला आहे. गोवा विद्यापीठाच्या या उपक्रमात मडकईतील स्थानिक महिला स्वयंसेवी गटांनी मोठा सहभाग दाखवला ही जमेची बाजू आहे. विशेषतः गोवा विद्यापीठाच्या या प्रकल्पाच्या निमंत्रक डॉ. लता गावडे या खुद्द मडकई गावच्या असून त्यांनी इतरांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे.

कशी केली कालवांची मत्स्यशेती
मडकईतील झुआरी नदीत कालवांची मत्स्यशेती करण्यासाठी ३ बाय ३ मीटर लांबीचे तराफे तयार करून प्रत्येक तराफ्याला ४ कालवांच्या कवचांचे प्रत्येकी एक दोर याप्रमाणे एकूण ३८ कालवांच्या कवचाच्या दोऱ्या बांधून त्या पाण्यात सोडण्यात आल्या. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर या दोऱ्यांना कालवांची पैदास मोठ्या प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी पारंपरिक कालवांची मत्स्य शेती नाही, अशा ठिकाणीही कालवा पैदास केंद्रे सुरू करणे शक्य आहे.

मडकईत मत्स्य शेतीला चालना मिळाल्याने एकापरीने स्वयंरोजगारासाठी ही चांगली संधी आहे. गोवा विद्यापीठाने उन्नत भारत योजनेंतर्गत खऱ्या अर्थाने मत्स्यशेतीला प्रोत्साहन दिले आहे. गोवा पर्यटन राज्य असल्याने अशाप्रकारचे उपक्रम हे गोमंतकीय युवक व महिलांसाठी उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे इतर ठिकाणीही असे प्रयोग व्हावेत.
- सुदिन ढवळीकर (आमदार, मडकई)

पर्यटनाला चांगली संधी
गोवा हे पर्यटन राज्य असल्यामुळे नवनवीन उपक्रम आखणे महत्त्वाचे आहे. मडकईतील कालवांची पैदास अर्थातच मत्स्य शेती उपक्रम यशस्वी ठरला आहे. पर्यटन क्षेत्रात अशाप्रकारचे उपक्रम होणे ही गरज असून त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत. मडकईतील यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन.
- डॉ. लता गावडे (निमंत्रक, मत्स्यशेती उपक्रम, गोवा विद्यापीठ)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT