Global Expo India conference Dainik Gomantak
गोवा

Global Expo India conference: ...तर गोवा सॉफ्टवेअर, हार्डवेअर उत्पादनासाठी ओळखला जाईल

पणजी येथे ग्लोबल एक्स्पो इंडिया परिषदेला अनेक देशांच्या उद्योजकांनी लावली हजेरी

गोमन्तक डिजिटल टीम

राजधानी पणजी येथे ग्लोबल एक्स्पो इंडिया परिषदेला सुरुवात झाली असून ही परिषद निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच परकीय गुंतवणुक आणि गोव्यातील उत्पादन क्षमतेच्या संभाव्यतेवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे. यावेळी अनेक देशातील उद्योजक ही हजेरी लावणार आहेत.

( The three-day Global Expo India conference began on Tuesday with industry representatives from across the country at Panaji goa)

मिळालेल्या माहितीनुसार पणजी येथे 'ग्लोबल एक्स्पो इंडिया'चे आयोजन हे गोव्यातील निर्यातीला प्रोत्साहन देणे असे आहे. यानुसार तीन दिवसीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत बोलताना ग्लोबल एक्स्पो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर दस्तीदा (Bhaskar Dastida ) म्हणाले की, गोव्यात थेट विदेशी गुंतवणूक आणि उत्पादनासाठी प्रचंड क्षमता आहे.

उत्पादनाची प्रचंड क्षमता असलेला गोवा आजपर्यंत जागतिक नकाशावर पर्यटनासाठी आला, मात्र निर्यात आणि थेट परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत आलेला नाही. याची सुरुवात या परिषदेच्या माध्यमातून होईल असा विश्वास दस्तीदा यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की उच्च साक्षर राज्य असूनही, गोवा सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर उत्पादनासाठी ओळखला जात नाही. ती ओळख बदण्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत स्पेन, कोलंबिया, इथिओपिया, युगांडा आणि मॉरिशस या देशांच्या उद्योजकांनी सहभाग घेतला. यावेळी गोव्यातील संशोधन आणि विकास, कृषी, सागरी अन्न पर्यटन, शिक्षण आणि मनोरंजन या क्षेत्राबाबत ही चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI: गुवाहाटीत महापराक्रम! 55 वर्षांच्या वनडे क्रिकेट इतिहासात कधीही घडलं नाही, ते घडलं; भारत-वेस्टइंडीज सामना ठरला क्रिकेट विश्वातील 'सुवर्णपान'

Goa Politics: 2 ऑक्टोबरला वीरेश बोरकरांची मोठी घोषणा; मनोज परबांच्या 'आरजी' प्रवेशाच्या चर्चांदरम्यान विशेष मुलाखतीत भूमिका स्पष्ट

Porsche Cayenne Electric भारतात लॉन्च! 2.5 सेकंदात 100 kmph, 642 किमी रेंज; जाणून घ्या किंमत आणि खास फीचर्स

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणासाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न; निवडणुकीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होईल, रमेश तवडकरांचा विश्वास

IND vs WI: शुभमन गिलचं द्विशतक, रोहित शर्माची शतकी खेळी अन् भारताचा दणदणीत विजय; तरीही गौतम गंभीर खूश नाही, कारण काय?

SCROLL FOR NEXT