Goa Accidental Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accidental Death: तिसरे काढण्यास गेलेला मुलगा बेतुल येथे बुडाला

Goa Accidental Death: साळ नदीत तिसरे काढण्यास गेलेली तीन अल्पवयीन मुले आज सायंकाळी बेतुल येथील नदीत गेली असता दोघांना बुडण्यापासून वाचवले. मात्र, साईराज प्रदीप जोशी (11) हा मुलगा पाण्यात बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेणे चालू आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Accidental Death: साळ नदीत तिसरे काढण्यास गेलेली तीन अल्पवयीन मुले आज सायंकाळी बेतुल येथील नदीत गेली असता दोघांना बुडण्यापासून वाचवले. मात्र, साईराज प्रदीप जोशी (11) हा मुलगा पाण्यात बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेणे चालू आहे.

ज्या दोन मुलांचे प्राण वाचविण्यात यश आले त्यांची नावे आरव वाडेकर (11) व साईराज सावंत (14) अशी असून हे तिन्ही मुलगे तारीवाडा - बेतुल येथील असून आज सायंकाळी ते तिघेही ओहोटीवेळी तिसरे काढण्यासाठी नदीत उतरले होते.

तिसरे काढून झाल्यावर सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते परतत असताना नदीतील पाणी भरतीमुळे अकस्मात वाढले आणि ही मुले गडबडून गेली. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर नदीच्या तिरावर असलेल्या एका व्यक्तीने त्यांना पाहिले. यावेळी त्या व्यक्तीने प्रसंगावधान राखून त्याने आणखी दोघांना सतर्क करीत पाण्यात उडी घेत दोघांना नदीच्या काठावर आणले. मात्र, साईराज जोशी हा मुलगा पाण्यात वाहून गेल्याने बेपत्ता झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narakasur Goa: 'नरकासुर' प्रथा खरेच बंद होणार का?

Goa Flight: भोपाळकरांसाठी खुशखबर! सुट्टीसाठी बॅग भरा, 28 ऑक्टोबरपासून गोव्यासाठी थेट विमानसेवा सुरू

अग्रलेख: ड्रग्ज व्यवहाराची आश्रयस्थाने शोधली तरच गोवा ‘नशामुक्त’ होईल..

Mulgao: 'गावचे प्रश्न सुटत नसतील, तर खाण व्यवसाय काय कामाचा'! मुळगाव ग्रामस्थ आक्रमक; मैदानावरून पंचायत मंडळ धारेवर

Goa Shipyard: अभिमान! सागरी सुरक्षेला नवी धार, गोवा शिपयार्डकडून ‘अजित’, ‘अपराजित’ गस्‍ती जहाजांचे जलावतरण

SCROLL FOR NEXT